MOUNTAIN OF GOD – UNEXPLORED HILL TOP

येथे अस्सल ग्रामीण संस्कृती पाहायला मिळते. भाकरी आणि चटणीच्या घासाबरोबर मिळणारे धारोष्ण दूध आणि साथीला भणभणता वारा.. सारेच कसे स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे. येथील धनगर बांधव शुरवीर आणि काटकही. वाघालाही नमवणारे अन् मी मी म्हणणा-या प्राण्यांना आपलेसे करणारे. डोंगरावरचे शिवस्थान आध्यात्माचा ठेवाच म्हणायला हवा!

पाच मिनिटांत शंभर पावलांमध्ये दोन जिल्ह्यांच्या चार तालुक्यांमधून भ्रमंती सहज शक्य आहे. असे सांगितल्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तुम्हाला यात कोणतीही अतिशयोक्ती याचे भान देवाच्या डोंगरावर पोहोचल्यावर लक्षात येईल. या स्थानाची तुलना दुस-या कशाशीही नको अगम्य, अविस्मरणीय आणि बरंच काही येथेच मिळविता येते, अनुभवता येते.. ढगांचे नृत्य, भणभणता वारा याचि देही याचि डोळा झेलावा मग मन पाखरू कसे होते.

भूतकाळ, वर्तमान सारं कधी विसरलो हे समजतही नाही. या स्थानावर सारं काही भरभरून घ्यावं. मस्तवाल वारा, नाक-कान गच्च करतो. धुक्याचे लोट अंगाखांद्यावर खेळू लागतात. जंगली प्राणी डोळय़ांसमोर मुक्तपणे हिंडत असतात. जैवविविधता तर येथे विपुल आहे. विशेष म्हणजे शहरी वस्तीत नेहमी गुणगुणत असणारी मच्छर कडीकुलपात राहणा-यांनाही अस्वस्थ करते. पण या भागात याचे नामोनिशान नाही.

येथे आकाशातील चांदणे न्याहाळात बसावे, पूर्ण आकाश अंगावर घेऊन झोपून जावे. तुम्हाला गंमत वाटेल पण दम्याचा कुणी रुग्ण असेल त्याने या चांदण्यात शेळया-मेंढय़ांच्या सहवासात झोप घ्यावी. दमा कुठच्या कुठे नाहीसा होतो. यामुळेच की, काय शेळया-मेंढयासोबत वावरणा-या या भागातील बांधवाच्या दिशेला ‘दमा’ फिरकतही नाही.  जगणं कसं असतं आणि असलेल्या सुविधांमधून आनंद कसा घ्यायचा हे येथे आल्यावर समजते.

डोंगरद-यात राहणारे धनगर बांधवांचे समृद्ध जग आणि सर्व सुविधा असूनही चिंतेच्या आठया डोक्यावर घेऊन वावरणारे आपले जग यात मग जमीन अस्मान दिसू लागते. हे स्थान आहे दापोलीच्या जामगे गावानजीकचे. येथे अस्सल कोकणाचे आदरातिथ्य धनगर बांधवांमध्ये न्याहाळता येते.

डोंगरावरचे शिवस्थान

सूर्योदय आणि सूर्यास्त याच डोंगरावरून पाहावा म्हणजे स्वर्गीय आनंदाची पर्वणीच अनुभवता येते. आध्यात्म आणि पर्यटन याची सांगड येथे जीवाभावाने सांधली गेली आहे. देवाच्या डोंगरावरच्या देव टेंबीवर शिवाचे मंदिर आहे.

दगडी बांधकामात साकारलेले मंदिर शिवकालात तानाजी मालुसरेंनी बांधले असावे असे काही उल्लेख सापडतात. सुमारे ५०० एकर क्षेत्रावर असलेली ही टेकडी रायगड, रत्नागिरी जिल्हयाच्या सीमेवर आहे. येथे मंडणगड, खेड, दापोली आणि रायगडमधील महाड तालुक्याची सीमा हद्द पोहोचते आणि या सर्व हद्दींचा केंद्रबिंदू शिवमंदिर आहे. डोंगर परिसरात धनगर बांधवांची मोठी वस्ती आहे. वस्ती जवळजवळ असली तरी दिशा जशा बदलतात तसे प्रत्येक वस्तीचे तालुके बदलून गेले आहेत.

अस्सल ग्रामीण संस्कृतीचे अनेक पैलू येथे पाहायला मिळतात. देवाच्या डोंगरावर पोहोचायचे तर दापोलीतून जामदे वाडीमार्गे रस्ता आहे. तुळशी गावातून पायवाट निघतात पण धनगर बांधवांशिवाय सामान्य माणूस त्या वाटेने जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षाच्या पाठपुराव्यानंतर या वस्तीपर्यंत आता बारमाही रस्ता पोहोचला आहे. यामुळे देवाच्या डोंगरावर थेट गाडीने पोहोचता येते. रस्ता जेथे संपतो तेथून ५०० मीटपर्यंत ३९८ पाय-या आहेत. या पाय-या चढल्या की दगडी बांधकामात साकारलेल्या शिवमंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. हे शिवलिंगाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

 

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे ‘देवाचा डोंगर’. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर असलेलं हे ठिकाण चार तालुक्यांचं केंद्रस्थान आणि दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारं आहे. डोंगरावरच्या चार वाड्या दापोली, खेड, महाड, मंडणगड या चार तालुक्यांमध्ये विभागलेल्या आहेत. चारही वाड्यांमधून समस्त धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यवर्ती शंकराचं स्वयंभू स्थान आहे, या स्थानामुळेचं डोंगराला ‘देवाचा डोंगर’ असे म्हटलं जातं. शिवमंदिर अगदी साधेसुधं आहे; पण मंदिराच्या परिसरातून चौफेर जे निसर्गाचे अप्रतिम, विहंगम दृश्य दिसतं, ते डोळ्यांना आणि मनाला अतिशय सुखद करणारं असतं. थंडीच्या दिवसात तर हे ठिकाण अनुभवण्याची निश्चितच एक वेगळी मजा आहे.  https://youtu.be/JsNJMNgTgZU

संदर्भ: प्रहार / देवाचा डोंगर

MAHALAXMI TEMPLE – KELSHI

गावाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या उटुंबर डोंगराच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमूख असून बांधकाम पेशवाई काळातील आहे. लांबून बघितले तर या मंदिराच्या इमारतीची रचना माशिदिप्रमाणे दिसते.

श्री महालक्षमी मंदिर – केळशी

इतिहासकाळात आपली मंदिरे भ्रष्ट होण्या पासून वाचवण्यासाठी तसेच गावाचे मांगल्य राखण्यासाठी केलेला हा एक उपाय असावा. मागील बाजूस असणाऱ्या उटुंबर डोंगराच्या घनदाट झाडीच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर सुरेख दिसते. या मंदिरला दोन घुमत असून त्याचे संपूर्ण बांधकाम चुना दगड असा पुरातन पद्धतीने केलेले आहे. दोन घुमटांपैकी एका घुमटाखाली श्री महालक्ष्मी देवीचे स्वयंभू स्थान आहे, दुसर्या घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत. या घुमटांची उंची खूप असल्यामुळे बाहेर कितीही उन तापलेले असले तरी यांच्या आतली हवा एकदम थंडगार असते. असे असूनही सूर्योदयानंतर काही विशिष्ट वेळेस सूर्य किरणे देवीवर पडतील तसेच सुर्यास्थाच्या वेळेस हीच सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श  करतील अशी विलक्षण रचना या मंदिरात केलेली आहे.

मंदिरापुढे धर्मशाळा बांधलेली असून त्यात पार्वती, गणपती आणि शंकराची पिंडी आहे. हि श्री शंकराची पिंडी तीलातीळाने वाढते अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या प्रांगणात वड,

 

पिंपळाची मोठ्या प्रमाणावर फोफावलली झाडे आहेत. या संपूर्ण मंदिराला पुरुषभर उंच जाभ्या दगडाची तटबंधी आहे. मंदिर परिसरात मागच्या बाजूला एक गोड्या पाण्याची विहीर असून तटबंधीच्या बाहेरच्या बाजूस एक खोल तळे आहे. या गोड्या पाण्याच्या विहिरीचे महत्व कारण संपूर्ण केळशी गावात खारे (मचूळ) पाणी असलेल्या विहिरी आहेत, पण देवीच्या मागच्या ह्या विहिरीचे पाणी मात्र गोड आहे. देवळामागे असलेल्या तळाच्या पायऱ्या बांधीव आहेत. त्यात अनेक कमळे उमललेली असतात. ह्या तळ्यात जिवंत झरे असल्यामुळे बारा महिने पाणी असते.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी  थोड्या उंचावर प्रसंगसमयी सनई चौघडा वाजविण्यासाठी नगारखाना बांधला असून, नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ देवळामध्ये सनईचे मंगल सूर गुंजतात. या मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा दरम्यान मोठा उत्सव असतो. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याखेरीज ह्या देवळात नवरात्रोत्सवसुद्धा साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गोंधळ, कीर्तन, रथयात्रा असे कार्यक्रम असतात व संपूर्ण गाव जातीभेद विसरून या उत्सवात सहभागी होते.

या देवीचे विशेष आख्यायिका अशी की कोणत्याही भावाकाने कोल्हापूरच्या आंबाबाईला बोललेला नवस त्याला तिथे जाऊन फेडणे शक्य होत नसेल तर तो नवस या महालक्ष्मी मंदिरात फेडला तरी चालतो, पण जर ह्या स्थानी कोणी भाविकाने नवस बोलला असेल, तर त्या भाविकाला तो नवस फेडायला इथे केळशीतच यावे लागते, बाकी कोणत्याही ठिकाणी त्याचा नवस फेडला जात नाही, असे येथील देवीचे महात्म्य आहे.

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

 

मंदिर परिसरातील तळे – https://www.youtube.com/watch?v=o8jFFQLllzI

KARNESHWAR TEMPLE, SANGAMESHWAR

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.

गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.

It is believed that Raja Karna from the Karvir dynasty established this temple almost 1600 years ago. The Karneshwar temple is said to be one of the most beautiful temples amongst all of Konkan region

संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर ‘कर्णेश्वर’ नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.

कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘शिवपंचायत’ आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.

 

मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.

मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच ‘संगमेश्वर’ नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.

अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

Karneshwar temple in Kasba, Sangameshwar, Kokan. – https://www.youtube.com/watch?v=1-1RkkK71Cg By- Mukta Narvekar

 

KADYAWARCHA GANPATI – ANJARLE

आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती मंदिराच्या निर्मित्तीचा इतिहास शोधताना आपण ११व्या शतकापर्यंत मागे जातो. १२व्य शतकांत मंदिर निर्मितीबरोबर मंदिरासमोर असलेल्या तलाव आणि मंदिराच्या सभोवतालची तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. हे प्राचीन मंदिर (बहुधा) लाकडी खांबावरील कौलारू किंवा गवताच्या छपराचे असावे.

ह्या देवळाबाद्दल्सुद्धा एक आख्यायिका आहे. किनाऱ्यावर आजरालयेश्वर हे शाम्भूम्हादेवाचे व सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले.त्यामुळे गणपतीने आपला मुक्काम जवळच्या कड्यावर हलविला. मंदिराच्या वाटेवर जाताना गणपतीचे पाऊल म्हणून एक ठसा उमटला आहे. गणपतीने समुद्रातून टाकलेले हे पाऊल म्हणून त्याची भक्ती भावाने पूजा केली जाते. अजरालय या मंदिरावरून गावाचे नाव आंजर्ले पडले अशी समजूत आहे. नंतर गावाच्या लोकांनी या टेकडीवर गणपतीचे व महादेवाचे अशी दोन देवेळे बांधली. या पूर्वाभिमुख मंदिराची लांबी ५५ फुट, रुंदी ३९फ़ुत आहे. या मंदिराच्या रचनेत सभाग्राहाला ८ कमानी आहेत गर्भाग्रहातही ८ कमानी आहेत. कमानी उभ्र्ण्याचे तंत्र प्राचीन असले तरी भारतात ही  पध्दती १५व्यशतकत प्रचलित झाली. घुमटाच्या माथ्यावरच्या बिंदूवर उमलत्या कामाल्पुश्पाच्या पाकळ्यांची नक्षी होती. काळाच्या ओघात ह्या दगडांचे विघटन होऊन इ. स. २००२ मध्ये ही कमळाकृती कोसळून पडली. देवळाच्या आतून उत्तरेच्या दिशेने मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे. ३० नोव्हेंबर १९९० ते २० फेब्रुवारी १९९३ ह्या कालावधीत जीर्णोद्धाराचे  काम पूर्ण झाले.

या प्राचीन मंदिराचे निर्माते आणि व्यवस्थापक कोण होते ह्याचा इतिहास अज्ञात आहे. इ.स.१६३० पासूनचा (म्हणजे छत्रपती शिवाजी जन्म काळापासून) इतिहास माहिती आहे. सतत १२ पिढ्यांपर्यंत ह्या देवस्थानचे व्यवस्थापन नित्सुरे घराण्याकडे आहे.

Excerpts from book by Medha Kanitkar

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

 

आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती: https://www.youtube.com/watch?v=o3_CRayg-bU

 

DEVRUKH MUSEUM

A far corner of Devrukh in the Ratnagiri District  of Maharashtra has become home to precious paintings of the Bombay School of Art. What’s more remarkable is how these works of art from the British era — now valued at Rs.4 crore — got retrieved and exhibited in the newly inaugurated fine arts museum.

The story goes thus: In order that the work of talented sons of the soil be preserved within Konkan, paintings were painstakingly collected by the 4th President of the institution, Late Shri Arun V Athalye, who was ably guided in his effort by Late Shri V S Gurjar, Some of the paintings collected by Late Shri Mulye Master were generously donated by his family to Mr. Arun Athalye for the Devrukh Shikshan Prasarak Mandal.

The paintings in this collection are rendered by artists who belonged to a tradition of painters known as ‘Bombay School of Art’. These painters and artists range from the three generations of the Pestonji Family, Pestonji Bomanji, Eruksha Pestonji and Dadiseth Eruksha, the father and son duo of the Haldankars, Late V S Gurjar, Late M V Dhurandhar, Late N R Sardesai, Late Dinanath Dalal and such other eminent artists whose work spans from 1850 through 1950 and beyond.

Today, they adorn the sprawling Lakshmibai Pitre Kalasangrahalaya thanks to a struggle, at whose forefront was 88-year-old resident Vasant Pitre. The seed for the museum was sown more than six decades ago. In order that the work of talented artists from the Konkan, Sindhudurg, Raigad, Ratnagiri belt be preserved, art teacher Yashwant Mule, artist V.S. Gurjar and art connoisseur Mr. Arun Athalye started collecting the paintings. From spending from his pocket, to raising donations, the new venture became an obsession.  But the dream was not to be fulfilled anytime during their lifetime. The paintings were donated to the Devrukh Shikshan Prasarak Mandal (DSPM) Trust.

“The paintings had gathered dust and were in a shambles. Around six years ago, a member of the committee illegally sold them. The process to retrieve them was lengthy and tedious,” said Shrinivas Virkar, council member of the Trust. It was then that Mr. Pitre, chairman of the Trust, got down to the job. The museum is named after his mother.

Work on the museum began about five years ago. Architect Arvind Sardal designed the building which stands on 6,000 sq.ft. of land. Mumbai-based curator Mrudula Mane was roped in. Under the guidance of museologist Sadashiv Gorakshkar, the restoration began. It was decided that the ground floor would be devoted to the Bombay School of Art painters. The second made space for contemporary artists.

Every painting offers a slice of history. Now you see a beautiful landscape of Kolhapur of the time, painted by Mr. Rahiman. Now you marvel at the earliest painting in the museum — a realistic portrait by Bomanji. Numerous, detailed human figures come alive in a small painting called “Devadarshan” in the trademark style of L.N. Taskar. 

“All the paintings on the ground floor have a strong western influence. It was just the beginning of realism in the country, where painters were moving away from depicting mythology. Their brush strokes, the use of water colour were borrowed from the West. But the core subject remained Indian,” said Ms. Mane.

The Committee:

Vasant Manohar Pitre – Chairman

Ajay Arun Athalye, Vijay Shivram Ambekar, Vaijanath Eknath Jagusthe, Shrinivas Ramchandra Virkar, Bharti Ajay Pitre, Asawari Sansare, Ranjit Marathe, Mahendra Mukund Damle, Kashinath Satyavan Salve, Milind Hegiste, Ratnadeep Gopal Adivrekar

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

Courtesy Internet

RATNAGIRI RURAL TOURISM

Indians believe in holidays. But for years the most common reason given for getting away was to visit one’s native place or on a pilgrimage. The world order is changing and so is the aspiration of the urban populace. The concept of a holiday where you let your hair down and relax has become the way of life. But with more and more people flocking major tourist destinations, a section of urban India has increasingly been denied the luxury of a family holiday because of unreasonably high rates. But now you can experience the rustic charms of rural India in a predominantly natural environment, where seasonality and local events blend with its culture, heritage and traditions. Rural tourism in the country is still evolving and Harsha Holidays is here to make life simple, yet attractive. 

Forget Matheran or Mahableshwar, or for that matter Lonavala and Khandala. Get your map out and try locale Tural, Mirya, Gavane, Devrukh, Nate..…..These are some of the latest hotspots in Ratnagiri where the tourists are heading for a break. International tourists too are making a beeline for these hitherto unheard locations that have emerged as Ratnagiri’s top rural tourism destinations in recent years.
Rural Konkan has a rich tradition of art and culture and can thus give a unique experience to tourists. It can also improve living standards in rural areas. Harsha Holidays defines Rural Tourism in Ratnagiri, as any form of tourism that showcases rural life, art, culture and heritage at rural locations, benefiting the local community economically and socially as well as enabling interaction between the tourists and the locals can be termed as Ratnagiri Rural Tourism.

Ratnagiri has a been a region of pilgrimage and culture. Once in Ratnagiri you would privilege yourself for gathering knowledge as to different religious facts and importance of them in ushering in peace in your life.  Holy Temples & Religious Shrines are one of the most popular Tourist Places in Ratnagiri. Temples in Ratnagiri have excellent architecture & a story behind each temple. If you go and visit these temples in Ratnagiri, you will feel so holistic & nature impression which is unforgettable.

Rural Ratnagiri has a rich tradition of art and culture and can thus give a unique experience to tourists. It can also improve living standards in rural areas. Any form of tourism that showcases rural life, art, culture and heritage at rural locations, benefiting the local community economically and socially as well as enabling interaction between the tourists and the locals can be termed as Ratnagiri Rural Tourism.

Given below is the SWOT analysis of Rural Tourism In Ratnagiri

DABHOL AND SHAHI MASJID (ANDA MASJID)

The Dabhol port boasts of centuries old history. Dabhol was of great importance in the 14th, 15th and 16th centuries. It used to be the principal port of South Konkan region, carrying on trade with

A 16th century Portuguese watercolour depiction of the port city of Dabul in India, entitled Távoa de Dabull (“Plate of Dabul”) featuring also an unusual Portuguese bastard-galley, sporting a square-rigged mast at the bow. Drawn by Dom João de Castro in 1538, for his work Roteiro de Goa a Diu, an itinerary in which were compiled geographical and hydro graphical information of the western coast of India between Goa and Diu.

ports in the Mediterranean, the Red Sea and the Persian Gulf. During 13th to 15th centuries this port was ruled by the Bahamani dynasty and was known as Mustafabad. Later on it was Hamjabad and then it was Dabhol.

 

You can find many religious places of Hindus and Muslims. There is a fine mosque called Shahi Masjid with dome and minarets standing close to the port which was built in Adilshah’s Regime. It is said that Adilshah’s Begum spent around 1.5 million rupees in Indian currency for the construction of this mosque. Shahi Masjid is an excellent example of Muslim architecture. Dabhol was previously very famous, but of late much ruined by the Wars, and decreased in trade.

Dabhol was conquered by Chattrapati Shivaji Maharaj around 1660 and annexed to the new Maratha kingdom. The erection of the Maratha fort of Anjanvel (Gopalgad)  right across the river eclipsed whatever role remained for Dabul, and the once-great port city simply evaporated and disappeared from the maps.

Attempts to locate the historic port have sometimes led historians to mistakenly identify historic Dabul with modern Dapoli, an interior town several miles north of Dabhol.

Due to the confluence of Hindus and Muslims population, Dabhol contains a number of religious places of both Hindus and Muslims.

Chandika Devi Mandir – Temple of Goddess Chandika, situated in a cave. The temple is believed to be a part of the ancient Dabhol fort. Remains of the fort wall can found at the entrance of temple premises. This is an underground temple. It is as old as Badami rock-cut temples.

Dabhol Jetty (Dhakka) – Until 80’s this jetty was being used for a boat service from Mumbai. Now it is used by fishing boats & for ferry services between Dabhol – Veldur, Dabhol-Govalkot.

Shahi Mosque – Also locally known as ‘Anda Masjid’. A beautiful mosque built in dressed black trap stone. The mosque was built in 1659 by Ayesh Bibi, princess of Bijapur. The Mosque is classified as heritage building by archaeological department. Shahi Masjid, one of the oldest masjid in Kokan region. The masjid was built with dome and minarets standing close to the port which was built in Adilshah’s Regime by the Princess Aisha Bibi in 1659-60 by the builder Kamil Khan. It is said that Adilshah’s Begum spent around 1.5 million rupees for the construction of this mosque. Shahi Masjid is an excellent example of Muslim architecture. There is a horse stable and fountain in good condition. Before 1800, Dabhol was said to be a famous port, but subsequently met with ruin due to wars and decreased trade

Sai Baba Mandir – The temple of god Sai Baba, located in Dhorsai, with dome and minarets standing close to the port which was built in Adilshah’s Regime by the Princess Aisha Bibi in 1659-60 by the builder Kamil Khan. It is said that Adilshah’s Begum spent around 1.5 million rupees for the construction of this mosque. Shahi Masjid is an excellent example of Muslim architecture. During that time, Dabhol was said to be famous, but subsequently met with ruin due to wars and decreased trade.

 

शाही मशीद, दाभोळ

कोकणामध्ये सोळाव्या शतकात म्हणजे आदिलशाही राजवटीत निर्माण झालेल्या मशीद म्हणून दोन मशिदींचा उल्लेख इतिहासात आढळतो. यातील एक म्हणजे चौलची हसाबा मशीद आणि दुसरी दापोलीत दाभोळ धक्क्यावर असलेली शाही मशीद. या मशिदीचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद म्हणूनही उल्लेख केला जातो.

कथा १: इ.स.१६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. हवामान ठीक नसल्याने पुढला प्रवास होऊ शकला नाही. तिच्यासोबत २०,००० घोडेस्वार व इतर लवाजमा होता. प्रवास रद्द झाल्याचे निश्चित कळल्यावर काय करावे या विवंचनेत असताना सोबत असलेल्या काझी व मौलवीने धन धार्मिक कार्यासाठी वापरावे असा सल्ला दिला. आयेषाबीबीने त्यानुसार ही मशीद बांधायचे काम हाती घेतले. ते चार वर्षे चालले. कामीलखान नामक शिल्पकाराने ही मशीद बांधली. त्यावेळेस १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे.

शाही मशीद, दाभोळ

कथा २: दुसऱ्या एका कथेनुसार सदर शहजादीला ऋतुदर्शन होईना म्हणून मक्केला जाण्यासाठी ती दाभोळ बंदरात आली. दोनचार दिवसानी ती निघणार तो ऋतू आला मग त्या मक्कावारीसाठी खर्च होण्याच्या पैशातून तिने ही भव्य मशीद बांधली.

कथा ३: तिसरी कथा म्हणजे एका फकिराने त्याच्याकडील एका अंड्यातून जन्मलेल्या एका कोंबडीपासून उत्पन्न झालेल्या अनेक कोंबड्या विकून ही मशीद उभारली. त्यामुळेच या मशिदीला अंडा मशीद असे नाव पडले. या मशिदीचे बांधकाम १५५९ मध्ये सुरु झाले व १५६३ मध्ये पूर्ण झाले अशीही एक इतिहास नोंद सापडते.

वास्तविक ही मशीद कोकण किनाऱ्यावरील सुस्थितीत असलेली आदिलशाही काळातील एकमेव इमारत आहे. मुघल स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना आहे. दाभोळ आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण वास्तू आहे.

 

 

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

Courtesy Internet

BEACH HOLIDAYS IN RATNAGIRI

A family trip combined with a Beach Holiday is one of the most enjoyable ways of spending a vacation. For a beach holiday on any one of the unmatchable Beaches of Ratnagiri is the perfect holiday that has something in it for everyone. The sun, sand, sea and surf are just the ingredients for mixing some high spirits and enthusiasm in your life!

Ratnagiri  is blessed with some untouched and heavenly beach locations that are a delight unto themselves. You will find plenty of isolated coves with long, clean uninterrupted stretches of golden sand that are just the right distance away to give you your privacy, while at the same time allowing you access to nearby towns and their convenience.

We, at Harsha Holidays, are happy to offer you some fantastic “Beach Holiday Package Tours” to some of the best beaches of Ratnagiri. Our beach tours are what dreams are made up of, with excellent accommodation being arranged for. They will give you the opportunity to relax and unwind in beautiful surrounding, as well as indulge in water-sports like Scuba Diving, snorkeling, deep-sea fishing, etc. We assure you, that while on your beach holiday, you will have a whale of a time!

Offering personal touch to your requirements, we will take you to the best beaches of Ratnagiri to crown your holidays with unforgettable memories!

 

BEACHES IN RATNAGIRI

Bhatye Beach | Mandvi Beach | Areware Beach | Mirya Beach | White Sand Beach (Scuba Diving Spot) Each beach has its own speciality and different from the other.

 

JAIGAD FORT

रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे.

किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.
गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.
बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते.

किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळमार्गे जयगडला जाता येते. हे अंतर ४६ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून निवळीमार्गे जयगडला भेट देता येते.

 

Jaigad Fort (Marathi: जयगड किल्ला ) (Also transliterated as Zyghur in old British records.) https://www.youtube.com/watch?v=ubAs6-LFskM

Courtesy Internet

RAJAPURCHI GANGA

रत्नागिरीचा संपूर्ण परिसर अनेक निसर्गनिर्मित आश्चर्यांसाठी प्रसिध्द आहे. आज आपण वाचणार आहोत “राजापूरची गंगा”

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष

आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. शिवाजी राजाच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूरची गंगा ही

 

तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड  अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते.

त्याची अख्यायिका अशी सांगण्यात येते कि एक वृद्ध वारकरी पंढरपूरला जाताना इथे आला. आपल्या वयोमानामुळे पुढे जातं येणार नाही असे वाटताच त्याने पांडुरंगाला दावा केला आणि प्रार्थना केली कि मी आता पुढे येऊ शकत नाही तर मला इथेच गंगेचे दर्शन घडव, आणि गंगा प्रकट झाली. अशी अख्यायिका श्री श्रीकांत घुगरे(देवस्थानाचे सचिव) ह्यांच्या कडून ऐकण्यात आली. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.  छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे ह्या ठिकाणी येऊन गेल्याची नोंद आहे.