पिढ्यापिढ्याची वैशाली

पिढ्यापिढ्याची वैशाली …. रत्नदुर्ग किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, थिबा पॅलेस, पतितपावन मंदिर, मांडवी बीच इत्यादी, हि जशी रत्नागिरीची सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख तसेच कॅफे वैशाली हे रत्नागिरीच्या खाद्यसंस्कृती मधील मानाचे पान. ८०-९० च्या दशकातील कॉलेज युवकांच्या स्वप्नातील पार्टीचे ठिकाण म्हणजेच ” कॅफे वैशाली”
रत्नागिरीतील पहिले फ्रेश आईसक्रीम, फ्रेश फ्रुट जूस अश्या गोष्टी कॅफे वैशालीनेच प्रचलीत केल्या… टिकवल्या म्हणूनच २ \ ३ पिढ्यानंतरही कॅफे वैशाली तरुणाईसह अबाल वृद्धांची प्रथम पसंती आहे.


रत्नागिरीतील आंबा मार्केट अर्थात प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या ह्या कॅफेत आपलेपणाने येणारे शेकडो संतुष्ट ग्राहक हीच कॅफे वैशालीची कमाई. गेली ३०हुन अधिक वर्ष कायम असलेले आचारी, कामगार वर्ग आणि त्यामुळेच कायम राहिलेली चव, दर्जा आणि नम्र सेवा हि परंपरा गेली ५ वर्षे मैत्री ग्रुपहि पुढे चालवत आहे.
फ्रेश फ्रुट जूस, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, चाट ह्यांच्या सोबतच इतरत्र कुठेही न मिळणारा “कोबी वडा” हा पदार्थ अजूनही जुनी मंडळी त्याच आपुलकीने प्रेमाने आनंद घेत असतात.

पार्टी आणि पार्सल ऑर्डर करीत संपर्क साधावा Paresh Sawant: 9175409191

 https://www.facebook.com/cafeinratnagiri/