PANHALEKAZI – ANCIENT CAVES IN DAPOLI

पन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली.न्हाळे नावाच्या गावात फक्त एकाच दुकान होते आणि मालकाचे नाव होते काझी म्हणून त्या गावाचे नाव “पन्हाळेकाजी” पडले असावे असा अंदाज बांधण्यात येतोपन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा.

STONE PILLAR

STONE CARVING

रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील थोरली – धाकटी  कोटजाई नदीजवळ “पन्हाळेकाजी” हे गाव आहे. हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा  ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या प्राचीन अशा भारतीय संस्कृतीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोरल्या- धाकट्या  कोटजाई नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत एक प्राचीन लेणी समूह आहे. या समूहात एकूण 28 शैलगृहे आहेत व 29 वे बागवाडी या ठिकाणी आहे.

या लेण्यांमध्ये भिक्षू गृहे,स्तूप, सभामंडप, मूर्ती व अनेक शिल्पे कोरलेली आढळतात.हीमयान, वज्रयान, नाथ संप्रदाय यांच्या निवासाच्या आणि शिलाहार साम्राज्याच्या अनेक खुणा येथे प्राप्त होतात. इतिहासकारांसाठी, अभ्यासकांसाठी पन्हाळेकाजी हे तर  सर्वतोपरी आकर्षण आहे, येथे येणारा मार्ग अडचणीचा असला तरी पर्यटक येथे आवर्जून येतात. पुरातत्व खात्याने नेमलेले मार्गदर्शक या ठिकाणची माहिती  पर्यटकांना अतिशय उत्तम रित्या देतात. त्यामुळे दापोली तालुक्यात  आलेला पर्यटक या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय निश्चितच राहत नाही.

Panhalekaji is situated in Dapoli city and located in Ratnagiri district of Maharashtra.These caves were unknown to the world for many centuries since its formation. Panhalekaji caves were rediscovered in the 1970’s. It is a great spot to explore for history lovers. The carving of Panhale Kazi caves had initiated somewhere around 3rd century AD.Structures of Panhalekaji caves have a similar appearance as world famous Ajanta Caves. Tourists can see various sculptures dating back to a 3rd century to 14th century inside these caves. Various statues of Hindu god-goddesses and Buddhism are there inside these caves. Tourists can see the complex art of ancient artists over here! All 29 caves are not placed next to each other; they are spread around the entire site. Some inscriptions in Brahmi and Devanagari languages are also there inside Panhale Kaji caves.

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

 

PANHALEKAZI – ANCIENT CAVES IN DAPOLI – https://youtu.be/tfrTqqx-r5U

Courtesy Internet

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *