वडापावाचा इतिहास
गोष्ट क्रमांक १
आपण सकाळ-संध्याकाळ पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पाळता ते खाऊ शकतो, य मुळे वडापाव खूप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला, ह्याचा कधी विचार केला आहे का?
१९६५ – ७० चा काळ होता, कमळाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, पाहुणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे, पुरणपोळी वगैरे … स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खून बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला ‘वडा’ हे नाव दिले. नवीन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेंव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खूप आवडला. पुढे पुढे मारवाडी होटेलवाल्यांनी त्यांची हि कल्पना चोरली आणि त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मध्ये चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चाहसोबात्च्या पावसोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहिल्यानंतर त्यांनी ‘रुचिरा’ हि पाककृतीची छोटेखानी पुस्तिका लिहिली. आजही पाककृती मधे
‘कमळाबाई ओगले’ यांच्या ‘रुचिरा’ चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. वयाच्या ८६ व्या वर्षी १९९९ साली पुण्यात निधन झाले.
गोष्ट क्रमांक २
इ. स. १९६६ साली दादर रेल्वे स्टेशनजवळ एक छोटेसे दुकान चालविणाऱ्या अशोक वैद्य ह्यांच्या मनात त्यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात थोडा वेगळा प्रयोग करण्याची इच्छा झाली. त्यांनी बटाटा वडा आणि पाव ह्यांना एकत्र करून एक नवीन पदार्थ बनविला आणि विकण्यास सुरुवात केली, हाच खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. हळू हळू वडापाव लोकप्रिय होऊ लागला आणि आजूबाजूच्या दुकानदारांनी अशोक ह्यांचा पावलावर पाऊल ठेऊन वडापाव विकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वडापाव हळू हळू प्रसिद्ध होऊन सर्वदूर पसरला.
१९९८ साली अशोक वैद्य निवर्तले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावचा जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे, जसं १९६६ साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं.
Continue Reading on Next Page…
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!