विड्याच्या पानाचा इतिहास

आपल्या पैकी अनेकांना विड्याचे पान खायला आवडते. आपल्याकडे भारतात लोक या विड्याच्या पानाचे प्रचंड शौकीन असतात. पान खाणे हा अक्षरशः एक सेपरेट विधी आपल्याकडे चालतो. पानाचे वेगवेगळे प्रकार देखील प्रसिद्ध आहेत. “नागवेल” या वनस्पतीची हि पाने आपण जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून घेतो.

या पानाचे फायदे आपल्या प्राचीन धर्मग्रंथात पण सांगितले आहेत. आयुर्वेदात पानांचे औषधी उपाय देखील सांगितले आहेत. अगदी आहाराच्या दृष्टीकोनातून बघायचे झाल्यास या पानामध्ये Calcium, Protein, Minerals यांचा अगदी उत्तम साठ आढळतो.  

 असं मानलं जातं कि या नागवेलीची पानं पूर्वी फक्त हिमालयातच सापडत असत. हिमालयामध्ये या पानांच्या विशिष्ट जातींची लागवड केली जात असे. हिमालयातील लोकांचा विश्वास होता कि स्वतः मत पार्वती आणि शिव  यांनी पानाचे पहिले बीज शंकर्हीमालयात रोवले आणि तेथपासून या पानांची उत्पत्ती सुरु झाली.

आज पान हे आपल्या संस्कृतीमध्ये मंगलदायी समजले जाते. अगदी तुळशीपत्र, बेल, मांजरी, दुर्वा या वनस्पती प्रमाणे विडयाला सुद्धा महत्व दिले जाते.  कुठलाही लग्न समारंभ असो, पूजा असो विड्याची पाने अश्या वेळी तांब्याच्या कलशात ठेवायला वापरली जातात. या पानांना एक प्रकारचे सांस्कृतिक महत्व आपल्या समाजात आहे. पूर्वीच्या काळी जेंव्हा कुठली गोष्ट ठरायची तेंव्हा करार म्हणून विड्याची पाने एकमेकांना देण्याचा प्रघात होता.

हे पान आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी ठरते. सगळ्यात पहिल्यांदा याचा महत्वाचा फायदा जर बघायचा झाला तर जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी पचन क्रिया वाढावी लागते. हि पचनक्रिया वाढवण्याचे काम हे पानामध्ये असलेल्या प्रोबियोटीक्समुळे केले जाते. त्यासाठी पचनाची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्यांना पान, लवंग, कात कुटून खाण्यासाठी आवर्जून संग्गीतले जाते. किंबहुना जुन्या काळी घरात जेवणानंतर पान, कात, लवंग वगैरे खलबत्यात कुटून खाण्याची आपल्याकडे पद्दत होतीच.

तोंडाचे जे काही विकार असतील त्यांच्यामध्येसुद्धा हे विड्याचे पान अत्यंत गुणकारी असते. आजकाल लोक  तोंडाला दुर्गंध येऊ नये म्हणून मिंटच्या गोळ्या चघळत राहतात. पान फार कमी जणांना माहित असेल कि जर सकाळ संध्याकाळ जर पान खाल्ले तर तोंडाचा दुर्गंध कायमस्वरूपी निघून जाण्यास मदत होते

अनेक गायक लोकांना आपण आत्तापर्यंत पान खाताना बघितले आहे. गायक लोक आपला गळा ठीक करण्यासाठी आणि आवाज मोकळा ठेवण्यासाठी हे पान खात राहतात. पान हिरड्यांवर आलेली सूज सुद्धा कमी करत. तसेच सर्दी आणि घसा बसला असेल कफ झाला असेल तरी त्यावरती विड्याची पाने मर्यादित प्रमाणत खाल्यास फरक पडतो.

कात, चुना, सुपारी नागवेलीच्या पानांवर ठेऊन त्याची पुरचुंडी करून खाणे हा विड्याच्या पानाचा सगळ्यात सोपा प्रकार समाजाला जातो. उपलबध्त्ता असेल त्या प्रमाणे विड्यात काजू पावडर, बदाम पावडर, सुंठ पावडर, गुलकंद, खोबर्याचा कीस, जायफळ, लवंग, मिरे, बडीशेप, असे अनेक पदार्थ घातले जातात.

 आपल्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो त्रयोदशगुणी विडा. तब्बल १३ प्रकारचे पदार्थ वापरून हा विडा बनवला जातो. कात, विलायची, लवंग, खोबरे, बडीशेप, सुपारी, खसखस, केशर, जायपत्री, कापूर, ज्येष्ठमध, कंकोळ हि सर्व प्रकारची सामग्री घालून हा विडा तयार केला जातो. भारतातील प्रमुख देवस्थानांमध्ये त्रयोदशगुणी विडा देवाला नैवेद्यमध्ये अर्पण करण्याची पद्दथ आहे. यात सगळ्यात श्रीमंत संस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखील समावेश आहे.

 

 

 

कातगोळ्या या कातापासून बनवलेल्या गोळ्या असतात. विडयाला सुगंध यावा आणि तोंडाचा दुर्गंध जावा म्हणून खास पान बनवताना या कातगोळ्याचा मुक्तहस्ते वापर केला जातो.

कातगोळ्या तयार करण्याची पद्दथ:

प्रथम कटाचे शुद्ध तुकडे घेतले जातात ते कुटून बारीक करून त्याची वस्त्रगाळ पूड बनवली जाते. केवड्याची ताजी पाने घेतात व त्या पानावर हि  वस्त्रगाळ केलेला कात ठेऊन तिची गुंडाळी केली जाते. हि कटाची पूड भरलेली केवड्याची पाने आठवडाभर ठेऊन दिली जातात. अगदी ओलसर अश्या पानामध्ये हि पूड गुंडाळून ठेवल्या मुळे ६-७ दिवसानंतर केवड्याच्या पानाचा रस पुडी मध्ये उतरतो आणि कातला केवड्याच्या सुगंधाचा घमघमाट यायला सुरुवात होते. हि केवड्याचा रस शोशून घेतलेली कटाची पूड नंतर वेगळी काढतात.

अश्या प्रकारे प्राचीन काळापासून स्वतःचा महिमा टिकवून ठेवलेले हे गुणकारी पान आजही आपल्या चवीला उपयोगास येते.

The Best Place To Grab A “Paan” In Ratnagiri Is “Ruchi Paan Mandir” Call – 9552570724 / 9552390724

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

संदर्भ इंटरनेट 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *