शिळ्या भाताच्या रेसिपीज

  • डोसे करण्याची कृती :

१. नॉनस्टिक पॅन  गरम करून घ्या .

२. एका वाटीत मिठाचे पाणी घ्या .

३. ताव चांगला तापला की तव्यावर मिठाचे पाणी पसरून  स्वच्छ कापडाने पुसून घ्या .

४. पॅन नॉनस्टिक वापरत नसाल तर कांदा मध्यभागी चिरून तेलात बुडवून प्रत्येक डोसा करण्याआधी तवा कांद्याच्या तेलाने पुसून घ्या .

५. तळाला पसरट असणारया मोठ्या वाटीने डोश्याचे पीठ तव्याच्या मध्यभागी घाला .

६. वाटीचा खालचा भाग तव्यातील पिठावर गोल फिरवत पीठ तवाभर पसरून घ्या . (वाटी तव्यावर फिरवताना एकाच दिशेने फिरवावी .)

७. १/२ मिनिटाने डोश्यावर आणि कडांना १ चमचा तेल सोडा .

८. डोसा योग्य भाजला की आपोआप काठ सुटतात .

९.  उरलेल्या भाताचा हा गरम गरम डोसा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खायला द्या .

शिळ्या भाताचे आंबोडे 
शिला भात आंबट दही घालून मळून घ्यायचा. तासभर तसाच बाजूला ठेवायचा. मग त्यात चवीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची / ठेचा / तिखट, किसलेलं आलं, मीठ, बेसन पीठ घालून भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत करून घ्यायचा. चिरलेली कोथिंबीर घालायची. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे गरम करून तेलात तळून आंबोडे करायचे. टोमॅटो सॉस, कोथिंबीर-पुदिना चटणी, खजूर चटणी यांबरोबर किंवा नुसते खायलाही छान लागतात.

शिळा भात खाण्याचे फायदे

अनेकवेळा रात्री आपल्या घरात भात उतरतो, आपण तो शिळा झाला असे समजून गाईला किंवा इतर प्राण्यांना खायला घालतो.  जास्त जास्त आपण फेकून देतो. आता तुमच्या घरी रात्री भात उरला असेल तर त्याला फेकू नका. कारण शिळा भात आरोग्यासाठी एक खजिना आहे

 

१. शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरिराचे तापमान कंट्रोलमध्ये राहते.

२. भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.

३. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते.

४. तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.

५. तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याचे सवय (व्यसन) आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.

 

संदर्भ इंटरनेट

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *