TEA STORY

चहा कोठून आला आपणास माहित आहे का?

आपल्या दिवसाची सुरुवात होते, ती एक कप चहाने. हाच एक कप आपल्या दिवसाची एकदम फ्रेश सुरुवात करतो. चहाच्या एका कपावरच मोठ-मोठी कामे होतात, नाहीच झाली तर शेवटी ‘चाय-पाणीच’ द्यावे लागते. दोन कटिंग मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यास मदत करतात. ‘चाय गरम चाय’च्या आरोळीने रेल्वे प्रवाशांची रात्र संपते आणि कपभर चहानेच आपला दिवस सुरू होतो. दिवसभर कामाने आलेली मरगळ एका कपाने कुठच्या कुठे निघून जाते. याच चहाची आम्हा भारतीयांना एवढी सवय झाली आहे की, आम्ही त्याला राष्ट्रीय पेयाचा दर्जा दिला आहे.

चहा एवढा भारतीय झाला आहे की जगभरातील एक प्रमुख निर्यातदार म्हणून भारताकडे पाहिले जाते. कदाचित, आपल्याला हेही माहीत नसेल की चहा हे परकीय भूमितून भारतात आलेले पेय आहे. चहात साखर विरघळावी आणि त्याला गोडी यावी, तशी गोडी चहाबद्दल भारतीयांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच अगदी उपवासातही ही गोडी सर्वांनाच हवी-हवीशी वाटते.

१५ डिसेंबर जागतिक चहा दिन साजरा करताना या तरतरीत चहाचा रंजक इतिहास माहीत करून घेणे गरजेचे वाटते. हा इतिहास साधा-सुधा नसून जगाला गवसणी घालणारा आहे. भारतात तर ‘चाय पे चर्चा’ पासून ‘चहावाला’पर्यंत आणि ‘चहाच्या कपातील वादळा’पासून ते ‘चलो एक चाय हो जाय’ पर्यंत चहा परवलीचा शब्द बनला आहे.

चहाचा जन्म

ख्रिस्तपूर्व २७३७ साली चिनी सम्राट शेन नुंग याने चहाचा शोध लावला असे मानले जाते. एकदा प्रवासात असताना सेवक त्याच्यासाठी पाणी उकळत होते. तेव्हा वाऱ्याबरोबर आलेली चहाची वाळलेली पाने त्यात चुकून पडली. तेच पाणी सम्राट प्यायला. त्याला ते आवडले आणि चहाचा जन्म झाला. काळाच्या ओघात तो एवढा वाढला की तो जगभरातील शौकीनांच्या घराघरात पोहोचला. चीनमध्ये तर ख्रिस्‍तपूर्व काळात चहावर मोठा ग्रंथही लिहला गेला.

बोस्टन टी पार्टी 

जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे बोस्टन टी पार्टी. १७७३ मध्ये ब्रिटीश सरकारने  ईस्ट इंडिया संस्‍थेला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती. पण वसाहतीमधल्या व्यापरांवर ब्रिटनचे असे नियंत्रण अमेरिकन राष्ट्रवाद्यांना मान्य नव्हते. त्याचा निषेध करण्यासाठी १६ डिसेंबरच्या रात्री तिनशे टन चहा समुद्रात फेकून दिला. या घटनेमुळे अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला वेग मिळाला होता.

बोस्टनच्या बंदरात ज्या परिसरात ही घटना घडली. तिथे बोस्टन टी पार्टी म्युझियम उभारण्यात आले आहे. १६ डिसेंबर १७७३ च्या त्या रात्रीचा सर्व घटनाक्रम दरोरज पुन्हा उभा करण्यात येतो. त्यामुळे म्युझियमला भेट देण्याऱ्या पर्यटकांना या बोस्टन टी पार्टीमध्ये सहभागी होता येते.

भारतातला चहाचा इतिहास

ब्रिटिशांनी जरी चहा भारतात आणून त्याच्या व्यावसायिक शेतीस सुरुवात केली असली तरी भारतात चहाचा वापर त्याच्या आधीपासूनच केला जात होता. ऐतिहासिक नोंदी असे सूचित करतात की, इ.स.पू. ७५० पासूनच भारतात चहाचा वापर केला जात होता. १६ व्या शतकात भारतीय लोक चहाच्या पानांपासून भाजीदेखील बनवत होते.  

स्कॉटिश शोधक रॉबर्ट ब्रुसला १८२३ मध्ये एक मूलभूत शोध लागला, जेव्हा त्याने पाहिले की, ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील  आदिवासी लोक चहाची लागवड करून त्याचे पेय बनवून पीत होते. आसामचे १८३४ मध्ये मनिराम दत्त उर्फ मनिराम देवन यांनी ही माहिती रॉबर्ट ब्रुस आणि त्याच्या भावाला दिली होती आणि त्यामुळे तो आसाममधील पहिला चहा उत्पादक बनला आणि १८३४ मध्ये मनिरामने उत्पादित केलेल्या चहाला अधिकृत चहा म्हणून मान्यता मिळाली. याच चहाची लागवड ब्रिटिशांनी व्यावसायिक पद्धतीने करायला सुरुवात केली.  १८३८ मध्ये भारतीय चहा पहिल्यांदाच लंडनला पोहचला. 

१८३५  साली दार्जिलिंग हा भाग इस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आल्यानंतर १८५०  साली यशस्वीरीत्या चिनी चहाची लागवड  करण्यात आली. १८३५ साली, दक्षिण भारतातील नीलगिरी पर्वतरांगेत प्रथमच लागवड करण्यात आली. अशा प्रकारे आसाम, दार्जिलिंग आणि नीलगिरी भागात मोठ्या प्रमाणात चहाची लागवड करून भारत हा जगातला चीननंतर सर्वांत जास्त चहा उत्पादन करणारा देश ठरला आणि भारतीय चहा जगभर प्रसिद्ध झाला. भारतात प्रत्येक भागात उगवल्या जाणार्‍या चहाची चव आणि सुगंध पण वेगळाच असतो. आपल्या देशात सर्व प्रकारच्या चहाचे उत्पादन होते. मुख्यत: चार प्रकारचे चहा आपल्याकडे बनवले जातात.

भारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल !

व्हाईट टी

व्हाईट टी

व्हाईट टी हा चहाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. ह्यावर अतिशय कमी प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. ह्याचा रंग आणि चव दोन्हीही सौम्य असतात. ह्याची चव नैसर्गिकरीत्याच गोड आणि सुंदर असते.

ग्रीन टी

ग्रीन टी

आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा चहाचा प्रकार हल्ली ट्रेंडिंग आहे. जगात आणि त्यातल्या त्यात आशियाई लोकांत सुद्धा ह्याच प्रकारचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. काही ठिकाणी ग्रीन टी मध्ये विविध प्रकारची फुले किंवा फळे घालून सेन्टेट आणि फ्लेवर्ड ग्रीन टी बनवण्याची पद्धत आहे. साध्या ग्रीन टीला सौम्य चव असते.

 

वूलॉन्ग टी

वूलॉन्ग टी

हा चिनी चहा आहे. हा चहाचा हा प्रकार चीनमध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेक चायनीज हॉटेल्स मध्ये हा चहा मिळतो.

 

 

ब्लॅक टी

आपण सगळे जो चहा पीत मोठे झालो आहोत तोच हा ब्लॅक टी. हा चहा स्ट्रॉंग चवीचा असतो. आपल्याला हाच कडक चहा आवडतो. कडाक्याची थंडी असो की मरणाचा उकाडा, दूध व साखर घालून केलेला गरमागरम चहा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा आहे.

काही लोक हाच ब्लॅक टी आईस टी म्हणून सुद्धा आवडीने पितात.

हर्बल टी

ह्या चहामध्ये कॅमेलिया झाडाची पाने नसतात. ह्या चहाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे Rooibos tea दुसरा mate tea आणि तिसरा प्रकार म्हणजे हर्बल इन्फ्युजन्स होय. ह्यातील हर्बल इंफ्युजन्स मध्ये शुद्ध औषधी वनस्पती, फुले व फळे असतात.

Rooibos Tea

हा दक्षिण आफ्रिकन रेड बुश पासून तयार करतात. ह्या चहाला रेड टी असे म्हणतात. हा चहा अतिशय चविष्ट लागतो आणि अनेक प्रकारच्या फ्लेवर्समध्ये मिळतो. हा चहा गरमागरम किंवा चिल्ड पिता येतो.

Mate Tea

हा कॉफीप्रेमींचा आवडता चहाचा प्रकार आहे. कारण ह्या चहाची चव कॉफीसारखी असते. Mate हे अर्जेंटिना मध्ये उगवणारे एक जंगली झुडूप आहे. ह्या झुडुपाच्या पानांपासून चविष्ट चहा तयार होतो.

टी ब्लेन्डस

टी ब्लेन्डस

टी ब्लेन्डस म्हणजे अनेक प्रकारचे चहा एकत्र करून एक उत्तम चवीचा प्रीमियम प्रकारचा चहा तयार करतात.

 

तर असे हे चहाचे विविध प्रकार आहेत. जगात पेयांमध्ये पाण्यानंतर चहाचा क्रमांक लागतो. जसे वाईन टेस्टिंग हे मोठे काम असते तसेच टी टेस्टिंग हे सुद्धा एक मोठे काम असते. चहाप्रेमी ह्याकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघू शकतात. चहा हा योग्य प्रमाणात घेतला तर आरोग्यासाठी चांगलाच आहे.

चहाचे फायदे जे तुम्हाला माहीत नसतील

जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो… मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील… चला तर पाहुयात, कसा ठरतो चहा बहुपयोगी…

केस चमकदार राहतात
ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.

असा करा वापर
केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.

 डोळ्यांना बनवा सुंदर
जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात.

असा करा वापर
डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.

 सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी
जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी ब‌ॅग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल.

 गुलाबाच्या फुलांची सुंदरता वाढवा
चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात.

 इंजेक्शनचं दुखनं कमी करण्यासाठी
जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही.

 पायांना बनवा सुंदर
जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.

असा करा वापर
कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील.

 मुरूम आणि पुटकुळ्यांना द्या सुट्टी
चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.

उन्हाळ्यात लाभदायक ३ चहाचे प्रकार

उन्हाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा असते. पण चहाची सवय काही केल्या जात नाही. बहुतांश लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात दूधाच्या चहाने करतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात दूधाचा चहा आरोग्यास घातक असतो. हर्बल चहा आरोग्यास अत्यंत लाभदायक असते. हर्बर चहामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखी आजार दूर होण्याची शक्यता असते.

पुदीन्याची चहा 
पुदीन्याचे सेवन पोटासाठी फार उपयुक्त आहे. जगातील ज्या हर्ब्समध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सीडंट्स असतात, पुदीना त्यापैकी एक आहे. पुदीन्यामध्ये विटामिन ए, मॅग्नीशियम, फॉलेट आणि आयरन भरपूर असतात. उकळत्या पाण्यामध्ये २ ते ३ चमचे पुदीन्याची पाने घाला. १५ मिनिटे ते उकळण्यासाठी ठेवा. त्यांनंतर ते मिश्रण गाळून प्या. गोड हवे असल्यास चहामध्ये एक चमच मध घाला.

तुळसीची चहा
तुलसीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुळसीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात आसते. तुळसी ची चहा बनवण्यासाठी एक पॅन मध्ये एक कप पाणी घ्या आणि ते चांगले उकळेपर्यंत गरम करा. उबळ आल्यावर पॅनचे आचे काढून त्यात ६-७ तुलसीची पाने व्यवस्थित धुऊन घाला. 2 मिनिटे झाकून ठेवून नंतर चहा गाळून प्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचे रस आणि एक चमच मध घाला. हा चहा आपल्या पोट, डोळे, यकृत, लिव्हर आणि हृदयसाठी खूप फायदेशीर आहे. दिवसातून २ वेळा चहाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही वजनही कमी करू शकता.

गुलाबाच्या फुलाची चहाची  
गुलाबाच्या फुलांमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. गुलाबाच्या चहामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. गुलाबाची चहा प्यायल्याने त्वचेवर चमक वाढते. गुलाबमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि विटामिन ई यांसारखे गुणधर्म असतात. गुलाबाची पाने शरीराची चरबी कमी करण्यात मदत करतात.

गुलाब की चहा बनवण्यासाठी दीड कप पाणी घ्या आणि त्यात एक ताज्या गुलाबची पाने घाला. आता १ मिनिटांपर्यंत जलद आचेवर उकळत ठेवा नंतर ३ मिनिटे चहा झाकून ठेवा. त्यानंतर चहा गाळून प्या.

संदर्भ इंटरनेट

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *