जांभूळ (Black Plum)

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. आशिया खंडात जांभळाचं मूळ आहे. हे झाड बहुगुणी आहे. याची पानं, लाकूड, फळ, बिया या सर्वाचा उपयोग होतो. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं.

जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या आणणारी असते. इंग्रजीत याला ‘ब्लॅक प्लम’ म्हणून ओळखलं जातं. जांभळाच्या पानांची पावडर टूथपेस्ट, साबण इत्यादीसाठी वापरली जाते. तर फळापासून मध, औषधं, रंग, रस इत्यादी तयार केलं जातं.

डहाळ्यांचा उपयोग टॅिनग व डाियग इण्डस्ट्रीत होतो. पावसाळ्यात जांभळं विशेषत: जास्त चांगली मिळतात. जांभूळ पित्तहारक, दाहनाशक, मूत्रगामी व ग्राही आहे. जांभळामध्ये ‘सी’ जीवनसत्व व ‘बी’ जीवनसत्व तसंच कॅल्शिअम, फॉस्फरस, फॉलिक असिड, कॅरोटीन, मॅग्नेशिअम, अँटीऑक्सिडंट्स व कॉलिनदेखील असतं. जांभळाच्या बीपासून पिवळसर तेल बनवतात. फळ हे थंड व कोरडय़ा गुणधर्माचं आहे. आता हे फळ अमेरिकेतही पिकवलं जातं.

औषधी गुणधर्म

 • पचनाच्या विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे.
 • जांभळात लोह भरपूर असल्याने हे रक्तवर्धक आहे.
 • जांभळाच्या रसाच्या आसव व सरबताने पोटदुखी व जुनाट हगवण दूर होते.
 • प्लीहा व लिव्हरच्या विकारात जांभळं गुणकारी असतात.
 • पांडुरोग व कावीळ झालेल्या रुग्णांसाठी जांभळं हितावह असतात.
 • जांभूळ फळ व बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध मानलं जातं.
 • जांभूळ अतिसार, मुरडा, संग्रहणी, रक्तपित्त, मुतखडा, मुत्राशयाचा दाह आदी रोगांतही उपयोगी आहे.
 • जांभळाच्या सालीची राख तेलात घालून भाजलेल्या भागावर लावावी. तसंच या सालीच्या काढय़ाने गुळण्या केल्यास घशाच्या सुजेमध्ये फायदा होतो.
 • जांभळाच्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण ते वातकारक असल्याने जपून खावे.
 • उन्हाने उष्णतेचा त्रास होत असल्यास जांभूळ खाल्ल्यावर तरतरी येते.
 • रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी जांभूळफळाचा फायदा होतो.
 • जांभूळरस स्मृतीवर्धक आहे.
 • ल्युकोडर्मामध्येही जांभूळ हे फायदेशीर आहे.
 • हृदयरोगावरही जांभूळ उत्तम मानलं जातं.
 • गळू व काही त्वचारोगांवर जांभळाची बी उगाळून लावल्यास फायदा होतो.
 • जांभळाच्या झाडाच्या सालीची राख ही दातांसाठी चांगली असते.

उपयोग –

जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो त्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वाचेच आरोग्य चांगले राहण्यासाठी व जांभळाच्या औषधी गुणांचा लाभ घेण्यासाठी सर्वानीच याचा आवर्जून आस्वाद घ्यावा. जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.
* पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे. जांभूळ हे दीपक, पाचक असल्याने न पचलेले अन्न पचण्यास मदत होते.

* यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७-८ जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे उकळवावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात ३-४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.

* गर्भाशयाच्या बीजकेशांना सूज आल्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व निर्माण होते. अशा वेळी हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जांभूळ बी १०० ग्रॅम, मंजिष्ठा ५० ग्रॅम, कारले बी ५० ग्रॅम, अशोका चूर्ण ५० ग्रॅम व सारिवा ५० ग्रॅम या सर्वाचे चूर्ण एकत्र करून सकाळी १ चमचा व रात्री १ चमचा घ्यावे. यामुळे बीजांडकोषाची सूज (पी.सी.ओ.डी.) हा आजार आटोक्यात येतो.

* जांभळाचे बी व साल ही मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी १५० गॅ्रम, हळद ५० गॅ्रम, आवळा ५० गॅ्रम, ५० गॅ्रम मिरे, ५० गॅ्रम कडुिलबाची पाने व ५० ग्रॅम कारल्याच्या बिया. यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेणे. यामुळे मधुमेह हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.

* पोटात येणारा मुरडा व अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी १ कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात.

* स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेतप्रदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभनकार्य करीत असल्याने या आजारावर गुणकारी आहे.

* एखाद्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत असेल तर त्या स्त्रीला जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस द्यावा. यामुळे जीवनसत्त्व ई मिळते व त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स निर्मितीला चालना मिळाल्यामुळे व स्तंभनकार्यामुळे गर्भपात रोखला जातो.

*  दात व हिरडय़ा कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्यात.

*  मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.

* चरकाचार्यानी यकृतवृद्धी या आजारावर जांभळे खाण्यास सांगितले आहे. यामध्ये असणाऱ्या नसíगक आम्ल रसामुळे यकृताचे कार्य व्यवस्थित चालते.

*  गर्भावस्थेत जांभळे भरपूर खावीत वा त्याचे सरबत प्यावे.  यामध्ये लोह, कॅल्शिअम, क आणि ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ चांगली होते.

* आम्लपित्त अरुची हे विकार झाले असतील तर जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घेऊ न एकत्र करून एका भांडय़ामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व ४-५ दिवस उन्हात ठेवावे, त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ २ चमचे घ्यावा याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

सावधानता –

जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत.

 

काही पदार्थ 

जांभूळाचे सरबत:

प्रथम पिकलेली व आकाराने मोठी फळे निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जांभळी पल्परच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 82 अंश से. तापमानाला 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रीक अ‍ॅसीड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडावे गरम करून निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचा गर: 1 लिटर
साखर: 1 किलो
पाणी: 4 लिटर
सायट्रीक अ‍ॅसीड: 2 ग्रॅम

जांभूळाचे स्क्वॅश:

जांभळाच्या फळांपासून स्क्वॅश तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करावी. फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्परच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82 अंश से. तापमानाला 30 मिनीटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रीक अ‍ॅसीड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडावे गरम करून निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचा गर: 1 लिटर
साखर: 1 किलो
पाणी: 1 लिटर
सायट्रीक अ‍ॅसीड: 2 ग्रॅम

जांभूळाच्या बियांची पावडर:

जांभळाच्या फळांपासून गर व रस काढल्यानंतर राहिलेल्या बियांपासून पावडर तयार करता येते. ही पावडर मधुमेही रोग्यांसाठी अत्यंत गुणकारी असते. त्या पावडरला बाजारपेठेत मोठया प्रमाणावर मागणी आहे. गर काढून घेतल्यानंतर राहीलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धूवून घ्याव्यात. त्या बिया ट्रे मध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश से. तापमानास 18 ते 20 तास ठेवावेत व उन्हात वाळवावेत. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राईंडरच्या मदतीने पावडर तयार करावी. नंतर पावडरचे वजन करून पॉलीथिन पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरडया जागी साठवून ठेवाव्यात.

In Maharashtra, jambul (locally know as jambhul) leaves is use as marriage pendals. There is a famous song in Marathi,’jambhul piklya zada khali dhol kunacha wajato’ which means “under the full fruity jambul tree dhol (drum) is beaten in joy”. This song is pictured on the famous Indian star Smita Patil

 

संदर्भ इंटरनेट 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *