कांद्याचे विविध उपयोग
कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता यात नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो.
कांद्याचे विविध उपयोग
- मार लागणार्या जखमेवर सुजेवर – कांद्याच्या २ फोडी कराव्या त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, कांच रुतुन झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागुन लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. ३ दिवसात आराम पडेल.
- बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुध्द पडलेल्या माणसाला कांदा फोडून त्याचा वास दिल्यास मनुष्य शुध्दीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा.
- उन्हाळी होणे – उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो. १-२ कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही.
- कृमी – पोटात कृमी झाले असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून ३ वेळा घेतल्यास कृमी मरुन ते बाहेर निघतील.
- प्रदर व प्रमेह — या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो.
- फ्ल्यू — कांद्याचा रस ३-३ तासाचे अंतराने १-१ चमचा दिल्यास फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो.
- मुलांच्या आकडीवर – कांदा फोडून त्याचा वास द्यावा.
- लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास कांद्याचा रस द्यावा.
- डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.
- कावीळ – थोडा कांदा, थोडा गुळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.
- डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा.
- तंबाखूचा त्रास – तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले तर त्यास कांद्याचा रस पाजावा.
- मुळव्याधीवर – साखर ,तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.
- हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुवून घ्यावा. गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.
- फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करुन त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होवून आराम वाटेल.
- उचकी, डोके दुखणे व झोप न येणें या विकारावर कांद्याला चिरुन किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.
- सर्दी. पडसे – झोपेचे वेळी १ कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खावून टाकावा. त्यामूळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मूलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास खोकल्यावरही फायदा होतो.
- पासोळ्याचे दुखणे – कांद्याला बारीक वाटून तो बरगड्या (पासोळ्या) दूखतात त्या ठिकाणी बांधल्यास फायदा होतो.
- उवा मारण्यास – कांद्याचा रस डोक्याला केसाला लावल्यास उवा, लीखा पळतात.
हे केवळ माहिती संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेउनच वापरावे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!