दही भात 

चला तर मग दही भात मागवूया “Harsha Terrace Garden”, Ratnagiri. Call: 9011948080 / 8975380697

पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, ” शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! ”

मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

 का खास आहे दही-भात

याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

वजन कमी होईल

स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.

कारण

कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *