You are “SAFE” with Home Delivery from Harsha Terrace Garden Restaurant

लॉकडाऊनच्या काळात अनेक घरपोच सेवा देणारे खाद्य व्यावसायिक वेगवेगळ्या युक्त्या लढवत असताना एक सुखद धक्का देणारी मैत्री ग्रुप संचलित ‘हॉटेल हर्षा’ (टेरेस गार्डन रेस्टॉरंट) यांची खाद्यपदार्थ होम डिलिव्हरी इमेज पहिली. पहाताक्षणीच भावलं ते त्यांचं डिस्काउंट वगैरे पेक्षा स्वच्छता, आरोग्य सुरक्षा (हायजीन) यावर भर देणं!!! या निमित्ताने हॉटेल व्यवसाय वीस वर्षांहून अधिक काळ जवळूनपणे पहाताना हॉटेल हर्षाची (आणि साहजिकच मैत्री ग्रुपच्या वतीने चालवली जाणारी हॉटेल सी फॅन्स, अंबर हॉल, कॅफे वैशाली, केटरिंग सर्व्हिस, हॉटेल मराठा ही साखळी) एकूणच वाटचाल माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.

सुमारे 15 वर्षपूर्वी हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्यापासून श्री. कौस्तुभ सावंत आणि श्री सुहास ठाकूरदेसाई यांच्या टीमने सध्या व्यवसायात शक्यतो न दिसणारी काही इथिक्स पाळली आहेत. दहा वर्षांपूर्वी (तेव्हाच्या) रत्नागिरी शहराच्या बाहेर हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची हिंमत त्यांनी दाखविली, शहरी धकाधकीपासून दूर, एका शांत टेरेसवर चवदार पदार्थांचा कुटुंबासह आस्वाद घेता यावा ही यामागची संकल्पना. साहजिकच ‘हर्षा’ची चव आणि नाव अल्पावधीतच लोकप्रिय झालं!!

अमित सामंत: Mobile: 82 75 455 465

Like & Follow us on :

  https://www.facebook.com/Harsha-Terrace-Garden-Restaurant-320681194792569/