HIRANYAKESHI TEMPLE, ORIGIN OF HIRANYAKESHI RIVER

आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणिक ठिकाणांपैकी हिरण्यकेशी हे एक. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते. मुख्य रस्त्यापासून साधारण

CAVE @ HIARANYAKESHI TEMPLE

तीन किलोमीटर अंतर आतमध्ये जावे लागते. वाटेत छोटी दोन गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता. उंचसखल आणि वळणावळणाचा. रस्ता संपला की पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेल्या पायवाटा. तिथे गाडी

थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढं जायचं. लोखंडी साकव पार केला की एकदम पेव्हिंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. चार पायऱ्या चढून गेल्यावर हिरण्यकेशी देवीचं मंदिर दिसू लागतं.

मंदिर गुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव

HIARANYAKESHI TEMPLE

पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्यानं सदोदित भरलेलं असतं. शेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्रीदिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्त्रोत पूर्वाभीमुख आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेशते. रामतीर्थाजवळून गावं-गावं ओलांडून गडहिंग्लज शहर ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.

Sacred to Goddess Parvati, Hiranyakeshi Temple is the point from where Hiranyakeshi River originates. In the main sanctum of the temple, there is an idol of Devi Hiranyakeshi (a form of Goddess Parvati) with golden hair and self-manifested red colour Shivling called as Hiranyakeshwar. The lingam is not visible as another Shivling, which is used for daily offerings and prayers, is overshadowing it. The temple is located amidst the lush forest but reaching here is not a problem as there are well-built roads.

Adjacent to the temple, there is a cave, which is said to be the point where the Hiranyakeshi river originates. Water rushes out with tremendous force to fall into a ‘Kund’ (tank), from where it further flows out.

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

Courtesy Internet

HIRANYAKESHI TEMPLE, ORIGIN OF HIRANYAKESHI RIVER – https://www.youtube.com/watch?v=YUI34etS55U

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *