KADYAWARCHA GANPATI – ANJARLE

आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती मंदिराच्या निर्मित्तीचा इतिहास शोधताना आपण ११व्या शतकापर्यंत मागे जातो. १२व्य शतकांत मंदिर निर्मितीबरोबर मंदिरासमोर असलेल्या तलाव आणि मंदिराच्या सभोवतालची तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. हे प्राचीन मंदिर (बहुधा) लाकडी खांबावरील कौलारू किंवा गवताच्या छपराचे असावे.

ह्या देवळाबाद्दल्सुद्धा एक आख्यायिका आहे. किनाऱ्यावर आजरालयेश्वर हे शाम्भूम्हादेवाचे व सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले.त्यामुळे गणपतीने आपला मुक्काम जवळच्या कड्यावर हलविला. मंदिराच्या वाटेवर जाताना गणपतीचे पाऊल म्हणून एक ठसा उमटला आहे. गणपतीने समुद्रातून टाकलेले हे पाऊल म्हणून त्याची भक्ती भावाने पूजा केली जाते. अजरालय या मंदिरावरून गावाचे नाव आंजर्ले पडले अशी समजूत आहे. नंतर गावाच्या लोकांनी या टेकडीवर गणपतीचे व महादेवाचे अशी दोन देवेळे बांधली. या पूर्वाभिमुख मंदिराची लांबी ५५ फुट, रुंदी ३९फ़ुत आहे. या मंदिराच्या रचनेत सभाग्राहाला ८ कमानी आहेत गर्भाग्रहातही ८ कमानी आहेत. कमानी उभ्र्ण्याचे तंत्र प्राचीन असले तरी भारतात ही  पध्दती १५व्यशतकत प्रचलित झाली. घुमटाच्या माथ्यावरच्या बिंदूवर उमलत्या कामाल्पुश्पाच्या पाकळ्यांची नक्षी होती. काळाच्या ओघात ह्या दगडांचे विघटन होऊन इ. स. २००२ मध्ये ही कमळाकृती कोसळून पडली. देवळाच्या आतून उत्तरेच्या दिशेने मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे. ३० नोव्हेंबर १९९० ते २० फेब्रुवारी १९९३ ह्या कालावधीत जीर्णोद्धाराचे  काम पूर्ण झाले.

या प्राचीन मंदिराचे निर्माते आणि व्यवस्थापक कोण होते ह्याचा इतिहास अज्ञात आहे. इ.स.१६३० पासूनचा (म्हणजे छत्रपती शिवाजी जन्म काळापासून) इतिहास माहिती आहे. सतत १२ पिढ्यांपर्यंत ह्या देवस्थानचे व्यवस्थापन नित्सुरे घराण्याकडे आहे.

Excerpts from book by Medha Kanitkar

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

 

आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती: https://www.youtube.com/watch?v=o3_CRayg-bU

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *