RAJAPURCHI GANGA
रत्नागिरीचा संपूर्ण परिसर अनेक निसर्गनिर्मित आश्चर्यांसाठी प्रसिध्द आहे. आज आपण वाचणार आहोत “राजापूरची गंगा”
राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष
आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. शिवाजी राजाच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूरची गंगा ही
तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते.
त्याची अख्यायिका अशी सांगण्यात येते कि एक वृद्ध वारकरी पंढरपूरला जाताना इथे आला. आपल्या वयोमानामुळे पुढे जातं येणार नाही असे वाटताच त्याने पांडुरंगाला दावा केला आणि प्रार्थना केली कि मी आता पुढे येऊ शकत नाही तर मला इथेच गंगेचे दर्शन घडव, आणि गंगा प्रकट झाली. अशी अख्यायिका श्री श्रीकांत घुगरे(देवस्थानाचे सचिव) ह्यांच्या कडून ऐकण्यात आली. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे ह्या ठिकाणी येऊन गेल्याची नोंद आहे.

GANGA UGAM – https://www.youtube.com/watch?v=n-ti_dOOo-U
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!