RATNADURGA FORT

पुराणकथेप्रमाणे भगवती देवीने रत्नासुराचा वध केला होता. त्यामुळे त्या देवीला रत्नेश्वरी असे म्हणत. त्यावरून रत्नागिरी हे नाव पडले. काहींच्या मते रतनगिरी या साधूंच्या वास्तव्यामुळे रत्नागिरी हे नाव प्राप्त झाले. कथा काहीही असो, रत्नागिरी हे नाव सर्वार्थाने सार्थ आहे हे नक्की. काही लोकांच्या मते वनवासामध्ये पांडवांनी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांना मदत केली होती.

हा किल्ला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर असल्याने त्याला भगवती किल्ला असेही म्हणतात. शिलाहार राजा भोजदेव याने हा किल्ला बांधला. त्यानंतर तो विजापूरचा सरदार पोत्तु चेन्ना रेड्डी याच्या ताब्यात गेला व त्याने थोडी-फार दुरुस्ती केली. इ. स. १६७०मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती केली. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर असून, २७ बुरुज आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे देऊळ, तसेच रतनगिरी महाराजांची समाधी आहे. गाडी किल्ल्यावर जाते.

किल्ल्यावर दीपस्तंभही आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांनी सन १७३१मध्ये भगवती देवीचे मंदिर बांधले. भगवती देवी कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण मानली जाते. सन १९४०मध्ये भागोजीशेठ कीर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे ४० फूट लांबीची सागवानाची गलबतावर लागणारी डोलकाठी बघण्यास मिळते. मंदिराजवळ किल्ल्यात भुयारे आहेत. तसेच डिसेंबर २०१७मध्ये या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोधही लागला आहे. येथील

समुद्रावरून येणारे वारे अंगावर घेणे एक सुखद अनुभव आहे.

The fort is also known as Ratnagad or Bhagavati fort. This horse shoe shaped fort has an area of 1300 x 1000 mts. On the side of the sea, the fort has a broken cliff at the bottom of which is a cave. There is a light house on the other side that guides the ships up to 15 kms.

The fort was built during the Bahamani period. Later, it was conquered by Adilshah that in turn was won by Lord Shivaji in 1670 from 1710 to 1755 it was kept by British and then upto 1810 it was under Peshwa’s possession. The queen of Jhansi has visited this fort in 1857 before the battle of Jhansi.

 

रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणे दीपगृह. किल्ल्याच्या उजवीकडचा उतार थेट कोळी वस्तीतून भगवती बंदराकडे जातो, तर डावीकडचा रस्ता थेट दीपगृहाकडे जातो. या रस्त्यावर डाव्या हाताला एका छोट्या घुमटीत रतनगिरी बाबांची समाधी आहे व त्यांच्यावरून या किल्ल्याला रत्नदुर्ग हे नाव पडले असावे असे स्थानिक सांगतात. या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते

 

A small hill on the Ratnagiri seashore has divided the Ratnagiri shore in two parts. Ratnadurga, popularly known as Bhagavati fort, with area of 120 acres, is situated on this hill.The fort is surrounded by sea. chatrapati Shivaji Maharaj won it in 1670 from Adilshah. The temple of Goddess Bhagavati is situated here. The beautiful sight of sun dipping into the sea is a must see for the tourists. https://www.youtube.com/watch?v=e5V7MGPhAmY

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *