LOST MAHARASHTRIAN RECIPES FROM ANCESTRAL KITCHEN

महाराष्ट्राची पाककृती फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या स्थानिक पाककृतींचा संग्रह आहे जो प्रदेशापेक्षा भिन्न आहे. या पाककृतींवर विस्तृत संशोधन करून आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील या प्रादेशिक स्वादांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व मसाले होममेड आणि एक व्यवस्थित ठेवलेले रहस्य आहेत.

आम्हाला काही माहित असलेल्या dishes आणि त्यांच्या recipes. तुम्हाला जर काही अजून recipes माहित असल्यास आमच्या whatsapp group वर टाकाव्यात. आम्ही त्या आमच्या Facebook Page  वर तुमच्या नावासहित post करू.  

अळुच्या पानातला मासा

साहित्य: कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, २ अळूची पाने, १ कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, १ मोठा चमचा खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, ६ पाकळ्या लसून, १ लिंबाचा रस, मीठ.
कृती: खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.
हा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते.

भारांगीच्या फुलांची भाजी

साहित्य: भारंगीची फुलं दोन वाटया, एक कांदा, मुग डाळ पाव वाटी, तिखट, मीठ, गुळ, खोबरं

कृती: भारंगीची फुलं चिरून दोन-तीन वेळा पाण्यातून पिळून टाकावीत. म्हणजे त्यांचा कडवटपणा जाईल. फोडणीत बारीक चिरून कांदा, मुग डाळ टाकून परतावी, त्यावर चिरलेली फुलं टाकावीत. त्यात मीठ, गुळ, तिखट, खोबरं घालून मंद आचेवर शिजवावी. फुलं परतून घेऊन भाजणीचं पीठ पेरूनही भाजी चांगली होते. भाजलेल्या खसखशीची पूड , भाजलेल्या तिळाचा कूट घालूनही उत्तम चव येते.

 शेवग्याच्या पानांची भाजी

साहित्य: १ ओंजळ शेवग्याची ताजी गडद हिरवी पाने, १ वाटी तुरडाळ, १ कांदा, खाद्य तेल, चवीपुरते तिखट-मीठ, मोहरी, ७-८ पाकळ्या लसूण

कृती: एकदम सोप्पीय, डाळ-मेथीची भाजी करतात तशीच फक्त मेथीऐवजी शेवग्याची पाने परावीत. शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून घ्यावीत. पाने चिरून तूर डाळीसहित कमी पाण्यात उकडून घ्यावीत. नंतर जास्तीचे पाणी काढून कांदा मोहरी फोडणी द्यावी. त्यातच लसूण घालून लाल करावा. तिखट मीठ टाकून भाजी परतून घ्यावी. एक वाफ आणावी. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरम गरम खाऊन घ्यावी.

मुळ्याच्या पाल्याची भाजी

साहित्य: मुळ्याचा पाला एक जुडी, हरभऱ्याची डाळ पाव वाटी, लसूण चार पाकळ्या, चवीपुरतं मीठ, आवडीप्रमाणे लाल तिखट, तेल पाव वाटीपेक्षा थोडं जास्त, फोडणीचं साहित्य.

कृती:  मुळ्याचा पाला धुऊन चिरून घ्यावा. डाळ दोन तास आधीच गरम पाण्यात भिजवून ठेवावी किंवा आदल्या रात्री भिजत घातली तर उत्तमच. लसूण ठेचून घ्यावा. फोडणी करून त्यात लसूण टाकावा. नंतर त्यात चिरलेला मुळ्याचा पाला घालावा. नंतर मीठ, तिखट घालावं. भिजवलेली डाळ त्यात घालून परतून वर झाकण ठेवावं. हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. प्रेशर पैनमध्ये ही भाजी एका वाफेवर होते.

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *