पाणी कसे आणि किती प्यावे ?

भरपूर पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे असे तज्ज्ञ सांगतात. कारण पाण्याच्या मदतीने आपले शरीर विषारी घटक बाहेर टाकते. डॉक्टरसुद्धा नेहमी जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे पचन क्रिया, त्वचा आणि केस मजबूत होण्यास मदत होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास नुकसान देखील होऊ शकते. पाण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत माहिती घेवूयात.

 पाणी पिण्याचे १० फायदे

* वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.
* पाणी पिण्याने जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
* मेंदू ९० टक्के पाण्याने तयार झालेला असतो. कमी पाणी पिल्याने डोके दुखू शकते.
* पाण्याने ज्यॉइट्सचा त्रास कमी होतो.
* शरीरातील मांसपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. त्या मजबूत करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
* सकाळी उठल्यानंतर १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते. त्वचा कोरडी पडत नाही.
* सकाळी उठल्यानंतर गरम अथवा कोमट पाण्यात मध आणि लिबू टाकून प्यावे. यामुळे टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर पडतात. इम्यून सिस्टिम उत्तम राहते.

 पाणी पिण्याचे १० तोटे

* जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने फॅट वाढते.
* खरबूज, काकडी खाल्यानतर लगेच पाणी पिऊ नये. सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
* जास्त पाणी पिल्याने जेवण पचण्यास उशीर लागू शकतो.
* काहींना पाणी पिल्याने जळजळ होण्याचा त्रास असतो.
* उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.
* प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्याने किडनीवर अतिरिक्त दबाव पडू शकतो.
* पाण्याच्या अति सेवनामुळे हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.* बायपास झालेल्या व्यक्तींनी पाणी कमी प्यावे.
* रिकाम्या पोटी पाणी पिल्यास सर्दी-ताप होण्याची भिती असते.

 हे त्रास असल्यास पाणी योग्यप्रमाणात प्यावे

* ताप आल्यास
* जास्त काम केल्यास
* अधून मधून पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थीत राहण्यास मदत होते.
* केस गळत असल्यास
* तणाव आल्यास
* त्वचेवर तारुण्य पिटीका आल्यास
* त्वचेवर फंगस, खाज येत असल्यास
* यूरिन इन्फेक्शन झाल्यावर

 असे प्या पाणी

पाणी १० मिनिटे उकळून गार करुन तहान लागल्यानतर पित राहावे. पाणी उकळताना त्यात आल्याचा एक तुकडा टाकल्यास फायदा होतो. उकळून गार केलेल्या पाण्यामुळे कफ आणि पित्ताचा त्रास कमी होतो. उकळून गार केलेले पाणी एका दिवसानंतर फेकून द्यावे. कोमट पाणी पिल्याने पित्त आणि कफ दोष होत नाही.

 सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे

आपल्या आरोग्यामध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. दिवसभरातून 3 – 4 लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरिरात पाण्याच प्रमाण अधिक असतं. म्हणून अनेकदा डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्या उठल्या अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला डायएेशिअन देतात. मग ते पाणी कधी कोमट असतं. तर कधी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. थोडंस हे विचित्र वाटेल पण उठल्यावर फक्त चूळ भरून पाणी पिणं हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात.

 • रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.
 • रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
 • ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
 • रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
 • जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.
 • सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.

पाणी पिण्याचे योग्य पर्याय कोणते?

 • उभे राहून कधीही पाणी पिऊ नये: आपण नेहमीच ऐकले असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. पण बऱ्याच जणांना या मागचं नेमकं कारण माहित नसेल. वास्तविक, उभं राहून पाणी प्यायल्यास ते घशातून थेट पोटातील खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील आवश्यक असे पोषकद्रव्य शरीराला मिळत नाही.
 •  सकाळी रिकाम्या पोटी भरपूर पाणी पिऊ नका: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. पण पाण्याचं प्रमाण हे एक लिटर पेक्षा देखील कमी असावं. परंतु लक्षात ठेवा की, जर एखाद दिवशी आपण अचानक सकाळी एक लिटर पाणी पिल्यास ते खूप हानीकारक ठरु शकतं.
 •  खाण्याबरोबर पाणी पिणे हानिकारक: जर तुम्हाला खाण्याबरोबरच पाणी पिण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. वास्तविक, अन्नाबरोबर पाणी प्यायल्यामुळे पोटातील गॅस वाढतो अन्न पचन होण्यास त्रास होतो. म्हणून, खाण्यापूर्वी अर्धा तास किंवा नंतर पाणी प्यावे.
 •  व्यायाम आणि कसरत दरम्यान पाणी कसं प्यावं?: व्यायामाच्या वेळी किंवा वर्कआउट करताना दरम्यान तुम्ही किती पाणी पितात आणि ते कसे पिता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. व्यायाम करताना तहान लागणं हे स्वाभाविक आहे. परंतु जर आपण एका घोटापेक्षा अधिक पाणी प्याल तर ते खूप हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर किमान एक तासानंतर पाणी प्यावे. एक-एक घोट पाणी प्याल्यास   डिहायड्रेशन होणार नाही.
 •  फ्रिजमधील थंड पाणी घटाघट पिऊ नये: जर तुम्हाला थेट फ्रीजमधून बाटली घेऊन घटाघट पाणी पिण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहचवू शकते. अशाप्रकारे पाणी पिण्याची सवय ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही.

BENEFITS OF DRINKING WATER

 

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

संदर्भ इंटरनेट 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *