बटर चिकनच्या जन्माची कहाणी…

चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्या मध्य बटर चिकन अग्रगण्य आहे. पण हे बटर चिकन मुळात भारतीय नाहीच असे सांगितलं तर तुम्हाला पटेल क? आपल्या आवडत्या बटर चिकनचा जन्म झालाय पाकिस्तानमधील पेशावरमध्ये.

बटर चिकनची किंवा हिंदीमध्ये ज्याला “मुर्ग माखनी” म्हणतात त्याची चव आता लोकांनी इतकी आपलीशी झाली आहे कि, ती चव दुसऱ्या रूपातही मिळते. टाकोजपासून पिझ्झापर्यंतची अनेक रूपं आपण बटर चिकनच्या चवीत खाऊ शकतो. चिकनमध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी हि डिश मूळ कशी तयार झाली, ह्याचा रंजक इतिहास खूप कमी जणांना माहिती आहे.

पेशावरमधील एका रेस्टॉरंटमध्ये रोटी बनविण्यासाठी तंदूरचा वापर केला जायचा. दही आणी मसाल्यांमध्ये marinate केलेलं चिकन या तंदूरमध्ये तयार करण्याचा प्रयोग केला गेला. पेशावरमध्ये मोखासिंग लांबा ह्यांच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रयोग झाला होता. यातून तंदुरी चिकनचा जन्म झाला. फाळणीनंतर हे रेस्टॉरंट बंद पडलं. तिथे काम करणारे कुंदनलाल जग्गी, कुंदनलाल गुजराल हे फाळणीनंतरच दिल्लीला स्थलांतरित झाले. त्यांनी ठाकूरदास या अजून एका निर्वासित तरुणासोबत दिल्लीत “मोती महल” नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आणि चिकनच्या पेशावरी डिशचा पुनर्जन्म केला. हे चिकन साठवण्याची योग्य यंत्रणा त्यांच्याकडे न्हवती. उरलेल्या तंदुरी चिकनची चव दुसऱ्या दिवशी बदलत असल्याचं त्यांच्या लक्ष्यात आलं. त्यातून गुजराल यांनी त्या चिकनची चांगली चव कायम ठेवण्यासाठी बटर, टोमाटो प्युरी, क्रीम आणी काही मसाले मिसळून ग्रेव्ही तयार केली. यातून तयार झालं “बटर चिकन”, अपघाताने बनलेली डिश असं आपण याला म्हणू शकतो.

दिल्लीतल्या “मोती महल” मध्ये तयार झालेल्या या बटर चिकनची चव अनेक राष्ट्रीय आणी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी चाखली आणी त्यांना आवडलेली चव आपल्या देशातील लोकांपर्यंतही पोहचवी म्हणून आपापल्या देशांत नेली.

थोडक्यात, बटर चिकनची ती जागतिक पातळीवरच्या प्रवासाची सुरवात होती. बटर चिकनच्या या प्रवासाबाबत असं म्हटलं जातं, कि पंडित नेहरुंना या चिकनची चव इतकी आवडली कि त्यांनी देशांमध्ये आलेल्या परदेशीय राजकीय पाहुण्यांसाठी खाद्य पदार्थ बनवण्याची जबाबदारी “मोती महल” कडे दिली.

संदर्भ इंटरनेट

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *