दक्षिणेतल्या सांबरचा शोध संभाजी महाराजांमुळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजे सांबार. इडली, डोसा, मेदूवडा या पदार्थांची नावं घेतली की सांबाराची आपोआपच डोळ्यासमोर येते. केवळ दक्षिणेतील लोकांच नाही तर जगभरातील खवय्यांना आपल्या चवीची भूरळ पाडणाऱ्या या सांबाराची ओळख जरी दाक्षिणात्य पदार्थ असली तरी या पदार्थाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांचे वंशज असणाऱ्या शहाजी राजांचे चुलत बंधू संभाजी राजेंच्या नावावरून या पदार्थाचे नाव पडल्याचे लेखी पुरावेही आहेत.

यासंदर्भातील माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यानेच लाइफस्टाइल वाहिनीवरील ‘करीज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात दिली आहे.  सांबाराबद्दल बोलताना कुणाल म्हणतो, ‘आज आपण तूरडाळ वापरून सांबार बनवतो. सांबार पहिल्यांदा कधी बनवला गेला यासंदर्भात अनेक कथा आहेत. मात्र सांबार हा पदार्थ पहिल्यांदा मराठ्यांच्या राजवटीमध्ये बनवण्यात आला. दक्षिणेमध्ये राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवला आली त्याचा त्या काळचा राजा संभाजी यांच्या नावावरून या पदार्थाला सांबार हे नाव देण्यात आले.’ आज आपण तुरडाळ वापरून सांबार बनवत असलो तरी सर्वात पहिल्यांदा सांबार हा उडदाची डाळ वापरून बनवण्यात आला होता असेही कुणालने सांगितले. पुढे बोलताना तो म्हणतो, ‘त्यामुळे यापुढे कधीही तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य उपहारगृहामध्ये सांबार खात असाल तर तुम्ही खरं म्हणजे एक मराठमोळा पदार्थ खाताय हे लक्षात ठेवा.’ 

सांबार की तैयारी की खास सामग्री

सांबाराच्या जन्माची आणि नामकरणाची कहाणी

विविध माहितीपट आणि खाद्य क्षेत्रातील जाणकारांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार सांबार हा मराठी पदार्थच आहे यात शंका नाही. यासंदर्भात इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास अनेक संदर्भा मिळतात. मराठा राजांच्या जेवणात तूरडाळीची आमटी हा मुख्य अन्नपदार्थ होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावूरपर्यंत मराठी राज्याचा विस्तार केला. त्यांचेच वंशज असणाऱ्या शहाजी राजांनी पुढे तेथील सत्ता संभाळली. शहाजींच्या कारकिर्दीतच पहिल्यांदा सांबार बनविण्यात आल्याचे संदर्भ तामिळ साहित्यात सापडतात. एकदा शहाजी यांनी त्यांचे चुलत बंधू संभाजी यांना मेजवानीसाठी आमंत्रण दिले होते. त्यावेळीच मुदपाकखान्यातील आमसुल संपल्याने आचाऱ्याने आमटीमध्ये चिंच वापरली. तंजावुरात चिंच मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आमटीची अंबट गोड चव टिकवण्यासाठी आमसुलांऐवजी चिंच वापरण्यात आली. शाही मेजवानीसाठी आलेल्या पाहुण्यांबरोबरच सर्व उपस्थितांना आमटीच्या चवीमधील हा बदल खूपच आवडला. संभाजी राजे हे मेजवानीसाठी आलेले खास पाहुणे असल्याने या पहिल्यांद बनवलेल्या पण खूपच चविष्ट अशा आमटीला संभाजी आमटी असे नाव देण्यात आले. पुढे अपभ्रंश होतं होतं त्या आमटीचे नाव संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबारम झाले.

सांबार हा पदार्थ संभाजी महाराजांशी जोडला असला तरी त्याबद्दल अनेक कथा रंगवून सांगण्यात येतात. यातल्या महत्वाच्या दोन कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !!!

कथा १
संभाजी महाराज एकदा दक्षिणेत तंजावरला शाहूजी राजेंना भेटायला गेले. शाहूजी राजे स्वतः पाककलेत प्रवीण होते. त्यांनी ठरवलं कि स्वहस्ते या पराक्रमी योद्ध्याला एखादा पदार्थ बनवून खाऊ घालूया. त्यांनी आमटी करावयास घेतली. आमटी बनवत असताना शाहुजींना समजले की कोकम संपलं आहे. यावर उपाय म्हणून पहिल्यांदाच शाहुजींनी कोकमऐवजी चिंच वापरली आणि अजून एक महत्वाचा बदल म्हणजे मुगाऐवजी तुरीच्या डाळीचा वापर केला. या बदलांमुळे एक नवीन पदार्थ तयार झाला. ही डिश संभाजी महाराजांना तर आवड्लीच पण दक्षिणेतही प्रचंड प्रसिद्ध झाली.

 कथा २

दुसऱ्या एका कथेनुसार संभाजी महाराज एकदा स्वतः स्वयंपाक करायला मुद्पाकखान्यात (किचनमध्ये) गेले होते. आमटी तयार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आमटीसाठी लागणारं कोकम संपलं आहे. (आता इथे पुन्हा मागील कथेशी संबंध येतो) यावर उपाय म्हणून एका आचाऱ्याने घाबरत घाबरत त्यांना कोकमऐवजी आमटीत चिंच घालण्याचा सल्ला दिला. या नव्या प्रयोगामुळे तयार झालेली आमटी चवीला वेगळी होती आणि असं म्हणतात इथूनच सांबारची खरी सुरुवात झाली.

महाराजांशी जोडल्या गेलेल्या या पदार्थाला नावही संभाजी महाराजांची आठवण म्हणून ‘सांबार’ देण्यात आलं. या कथांना कागदोपत्री काही पुरावा नसला तरी सांबारचा संभाजी महाराजांशी संबंध आहे यात काही शंका नाही.

For #Delicious #Food call #Harsha #Terrace #Garden #Restaurant #Home #Delivery(#Ratnagiri #City Only) : 9011948080
#STAY #HOME | #STAY #SAFE | #STAY #HEALTHY
Click the link below to be on our #whatsapp #group for updates on #Offers / #Freebies / #Food #Knowledge / #Recipes much more… https://chat.whatsapp.com/KYX5wuHoHyt2B4t5n4z4d9

 

संदर्भ इंटरनेट

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *