पेरु (GUAVA)

इंग्रजीत एक म्हण आहे –  “AN APPLE A DAY KEEPS DOCTOR AWAY” म्हणजे रोज जर एक सफरचंद आहारात असेल तर डॉक्टरची गरज भासणारच नाही. निश्चीतच आपल्या सभोवताली असलेल्या फळांमध्ये सफरचंद या फळाचे महत्व अनन्य साधारण आहे.

परंतु कदाचीत ब्रिटीशांकडे किंवा युरोपियन देशात पेरु चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर  झाले असते तर ही म्हण बदलली असती असे वाटते. त्याचे कारण म्हणजे पेरु या फळात असलेले गुणधर्म.

खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरुची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपणाला रोजच्या आहारात लागणा-या घटकांपैकी बव्हतांशी घटक पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. इतके की पेरुला सुपर फुड म्हणणे अतीशयोक्ती नाही ठरणार.

हैद्राबाद येथील नँशनल इन्स्टीट्यूट आँफ न्यूट्रीशन मध्ये 14 फळांचा एक  अभ्यास केल्या गेला. त्यावेळी त्यांनी जो निष्कर्ष काढला त्यानुसार सर्व फळांच्या तुलनेत सर्वात जास्त अँन्टीआँक्सीडन्ट्सचे प्रमाण पेरुमध्ये आढळले.

 

पेरु

सफरचंद

100 ग्रँम पेरुमध्ये 500 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स 100 ग्रँम सफरचंद मध्ये 135 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स

मोठ्या प्रमाणात प्रथीने, व्हिटामीन्स, मिनीरल्स व फायबर सारखी जीवनावश्यक तत्वे आढळतात. या सर्व घटकांचे प्रमाण पाहिले तर पेरुच्या तुलनेत सफरचंद शर्यतीत खूप मागे असल्याचे जाणवते.

पेरुच्या बियापासून निघालेल्या तेलात आयोडीनचे प्रमाण सुद्धा आढळून आलेले आहे त्यामुळे थायराँईड सारख्या आजाराच्या रुग्णांना पेरु निश्चीतच फायदेशीर ठरेल.

100 ग्रँम पेरु पासून 68 कँलरीज उर्जा मिळते 100 ग्रँम सफरचंद पासून 52 कँलरीज उर्जा मिळते

फायबर हा आहाराचा एक आवश्यक घटक आहे. लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह या सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या आहारात फायबरचे प्रमाण कमी असते. याकडे आपण कधीही लक्ष देत नाही.

100 ग्रँम पेरु पासून 22% फायबर मिळतात 100 ग्रँम सफरचंद पासून 10 % फायबर मिळतात
100 ग्रँम पेरु पासून 2.6 ग्रँम्स Proteins मिळतात 100 ग्रँम सफरचंद पासून 0.3 ग्रँम्स Proteins मिळतात
100 ग्रँम पेरु पासून दररोज आवश्यक असणा-या व्हीटामीन C ची 275 टक्के गरज पूर्ण होते. 100 ग्रँम सफरचंद पासून दररोज आवश्यक असणारे व्हीटामीन C ची केवळ 6 टक्के पुर्तता होते

व्हिटामीन्सचा जर विचार केला तर बी काँम्ल्पेक्स चे (B1,B2,B3,B5,B6,B9) हे सर्व व्हिटामीन पेरू मध्ये सफरचंदापेक्षा दुपटीने व तिपटीने जास्त असतात.

गरोदर स्त्रियांमध्ये मुख्यत: पहिल्या 12 आठवड्यापर्यंत फोलेटची अत्यंत गरज असते. होणा-या बाळाला काही COMPLICATIONS होउ नयेत म्हणून हे महत्वाचे असते

फोलेट 100 ग्राम पेरुमध्ये 49 मायक्रोग्राम फोलेट 100 ग्राम सफरचंदमध्ये 3 मायक्रोग्राम
कँल्शीअम 100 ग्राम पेरु पासून 18 मिलीग्रँम कँल्शीअ कँल्शीअम 100 ग्राम सफरचंदपासून 6 मिलीग्रँम कँल्शीअ
लोह 100 ग्राम पेरु पासून 0.26 मिलीग्रँम लोह 100 ग्राम सफरचंदपासून 0.12 मिलीग्रँम
मँग्नेशिअम 100 ग्राम पेरु पासून 22 मिलीग्रँम मँग्नेशिअम    100 ग्राम सफरचंदपासून 5 मिलीग्रँम
फाँस्फरस 100 ग्राम पेरु पासून 40 मिलीग्रँम फाँस्फरस 100 ग्राम सफरचंदपासून 11 मिलीग्रँम
पोटँशिअम 100 ग्राम पेरु पासून 417 मिलीग्रँम पोटँशिअम 100 ग्राम सफरचंदपासून 107 मिलीग्रँम

पेरु गैरसमज, काळजी

  • भरपूर प्रमाणात क जीवनसत्व देणारे पेरु हे फळ थंडीच्या दिवसात निरनिराळ्या व्हायरस पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी खोकला होतो या गैरसमजामुळे मुलांना चिंच, आवळा, पेरु या फळांपासून दूर ठेवण्याकडे आपला कल असतो. शंभरातून एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाहीत म्हणून सर्वांनाच यापासून वंचीत ठेवणे अयोग्य आहे असे नमूद करावेसे वाटते.
  •  पेरु खाताना काही काळजी घेणेही तेवढेच आवश्यक. भल्या पहाटे किंवा रात्रीच्या वेळी पेरु खाने टाळावे व फ्रिजमध्ये न ठेवणे चांगले. दुपारी जेवणानंतर पेरु खाने फायदेशीर ठरते. कच्चा पेरु बाधू शकतो. पिकलेला पेरु चांगला. पेरु खाताना अल्प प्रमाणात जिरे, मिरे पूड घालून खाल्ल्याने पेरु बाधण्याची शक्यता कमी होते व चवही सुधरते.

 एक संदेश

आजारी व्यक्तींना निरोगी करण्यासाठी सफरचंदचा वापर करणे व निरोगी व्यक्तींनी आजारी पडू नयेत त्यांना सर्व पौष्टीक घटक मिळावेत म्हणून पेरुचा वापर करावा.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *