आवळा (Indian Gooseberry)

आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने 

फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आव

ळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.
‘सी’ व्हिटॅमिनने पूर्ण-
आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके ‘सी’ व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात व संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त ‘सी’ व्हिटॅमिन आढळते.

 आवळ्याचे लोणचे

आवळे धुवून पुसून ठेवावेत. कढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या मातकट रंगाच्या होईपर्यंत तळाव्यात. त्याच तेलात मोहरी, जिरं, उडीद डाळ, मेथी, हिंग आणि कढीपत्ता तडतडू द्यावा. गॅस बारीक करून त्यावर आवळे सोडावेत आणि मीठ घालावे. जर तुम्हाला गरज वाटली तर पाण्याचा हबका मारावा. यामुळे आवळे फुटून ब‌यिा बाहेर पडतील. आता गॅस बंद करून सर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे आणि बरणीत भरावे

 आवळा कँडी

आवळे बारीक चिरावेत. त्यातल्या बिया काढाव्यात. साखरेचा पक्का पाक करून तो गार झाल्यावर त्यात आवळ्याचे तुकडे टाकावेत. ते पाकात पूर्ण बुडायला हवेत. एक दिवस हे मिश्रण असंच झाकून ठेवावं. दुसऱ्याे दिवशी जास्तीचा पाक गाळावा आणि त्यात साखर घालावी. आता हे मिश्रण पुन्हा एकदा उकळावे. त्यात आवळ्याचे तुकडे घालून मिश्रण पुन्हा एक दिवस ठेवावे. पुन्हा सगळी रित तशीच करावी व आता मिश्रण पाच दिवस ठेवावे. आता आवळ्याचे तुकडे बाजूला काढून उन्हात पूर्ण सुकवावेत. साखरेचे दाणे आवळ्यावर घट्ट बसलेले दिसतील. हाताला चिकटपणा लागणार नाही याची खात्री करून कॅन्डी तयार झाली असे समजावे व ती बाटलीत भरावी

 खारे आवळे

आवळ्याचा सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे खारातले आवळे. बाजारातून छान टपोरे आवळे आणावेत. एका बरणीत मीठ आणि पाणी घालावं. या खारामध्ये आवळे बुडवून ठेवावेत. थोडे दिवसांनी हे खारातले आवळे मिटक्या मारीत खावेत

  • आवळा खाण्याची इच्छा अनेकांना असते पण त्याचा आंबटपणा आणि तुरटपणा अनेकांच्या दातांना सोसत नाही. अशावेळी आवळा खाताना त्याला मीठ, हिंग आणि तिखट लावून खावे. त्याचा आंबटपणा तुरटपणा बराच कमी होतो
  • भूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते
  • पित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो
  • आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते
  • आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते

आवळा सुपारी

नुसते जिरे आणि मीठ लावून वाळवण्या पेक्शा अशी करून पहा , बाहेरच्या आवळा सुपारी पेक्षा ही जबरदस्त लागते. १ किलो आवळे चाळणीवर वाफवून, ७-८ लिंबाचा रस ,जिरे ओवा बारीक करून, शेंदेलोण , पादेलोण , आमचूर पावडर , ज्येष्ठमध , मीठ घालून थोडा वेळ मुरत ठेवा , मग त्यात आवळा घालून चांगले कालवून ,प्लास्टिक च्या कागदावर वाळवा

 

आवळ्याच्या चटपटीत वड्या

साहित्य: दहा ते बारा चांगले मोठे आवळे, एक छोटा चमचा हिंग पूड, अर्धा छोटा चमचा लाल तिखट व तेवढेच मीठ, दोन छोटे चमचे ओवा व जिरे पूड, अर्धा छोटा चमचा शेंदेलोण व पादेलोण

कृती: प्रथम आवळे चांगले मऊ शिजवून घ्यावेत. त्यातील बी काढावे. सर्व आवळ्याचा गर अगदी बारीक कुस्करावा किंवा वाटण करावे. त्यात बाकीचे सर्व साहित्य घालून खूप कालवावे. तयार लगद्याचे आपण सांडगे घालतो तशा लहान लहान वड्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून उन्हात वाळवाव्यात. खडखडीत वाळल्या, की बाटलीत भरून ठेवाव्यात. या वड्या चविष्ट लागतात व तोंडाला रूची आणतात

 

आवळ्याच्या चटपटीत वड्या

साहित्य: दहा ते बारा चांगले मोठे आवळे, एक छोटा चमचा हिंग पूड, अर्धा छोटा चमचा लाल तिखट व तेवढेच मीठ, दोन छोटे चमचे ओवा व जिरे पूड, अर्धा छोटा चमचा शेंदेलोण व पादेलोण

कृती: प्रथम आवळे चांगले मऊ शिजवून घ्यावेत. त्यातील बी काढावे. सर्व आवळ्याचा गर अगदी बारीक कुस्करावा किंवा वाटण करावे. त्यात बाकीचे सर्व साहित्य घालून खूप कालवावे. तयार लगद्याचे आपण सांडगे घालतो तशा लहान लहान वड्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून उन्हात वाळवाव्यात. खडखडीत वाळल्या, की बाटलीत भरून ठेवाव्यात. या वड्या चविष्ट लागतात व तोंडाला रूची आणतात

 

आंबटगोड तिखट आवळे

साहित्य: २५० ग्रॅम आवळे, दीड चमच तेल, अर्धा चमचा हळद,१ लहान चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, १ लहान चमचा बडीशेप, मेथीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, २-४ लाल मिरच्या

कृती: कुकरमधून आवळे वाफवून घ्या, बिया काढून त्याच्या फोडी करा, कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, बडीशेप मेथीचे, दाणे, लाल-तिखट घाला, त्यात लाल मिरचीचे तुकडे टाका, हळद, मीठ घालून मंद आचेवर शिजू द्या, अधून-मधून हलवत राहा. आपला वेगळा असा चट-पटीत आवळा तयार आहे

 

आवळ्याचे लोणचे

साहित्य: पाच-सहा रसरशीत डोंगरी आवळे, एक मोठा चमचा मोहरीची कुटलेली डाळ, दोन छोटे चमचे लाल तिखट, दोन छोटे चमचे मीठ, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा पिठीसाखर व हिंगपूड, चिमटीभर मेथी पूड, पाव वाटी तेल

कृती: आवळे वाफेवर उकडून घ्यावेत. त्याच्या पाकळ्या बीपासून वेगळ्या कराव्यात. मग एका तसराळ्यात मोहरी डाळ, तिखट, हिंग पूड, मेथी पूड व हळद एकत्र करून त्यावर गरम कडकडीत तेल घालावे. हा मसाला कालवून गार झाल्यावर त्यात मीठ व साखर घालावी. लोणचे चांगले कालवून सटात ठेवावे

 

आवळ्याचे झटपट सरबत

साहित्य: आवळे ५-६, मिरपूड अर्धा टीस्पून, आल्याचा रस अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, साखर २ टेबलस्पून, अाणि लिंबाचा रस पाव टीस्पून
कृती: सर्वप्रथम आवळे वाफवून घ्यावे अाणि बिया काढून फक्त गर काढावा. आता गरामध्ये साखर, मिरपूड, मीठ, आल्याचा रस, मीठ घालून एकत्र पल्प बनवा अाणि चाळणीने चाळून घ्या. दोन चमचे रस अाणि पाणी घालून मिक्स करा. आवळ्याचं सरबत सर्व्ह करा.

 

मोरावळा – Moravla

साहित्य: आवळे १/२ किलो, साखर १/२ किलो, वेलचीपूड ऐच्छीक, सुंठ पावडर ऐच्छीक, सैंधव मीठ चिमूटभर

कृती: मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून, वेचून घ्यावेत. असे आवळे चांगले रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात. प्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.

नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला टोचून भोके पाडावीत. आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात. आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी. एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी साखर विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे. साखरेचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको. गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड – तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय बर्षभर टिकतो. असा मुरलेला एक आवळा रोज सकाळी अनशापोटी खाल्ला व वरून कोमट पाणी प्याले तर अतिशय आरोग्यदायी असते. ज्यांना पित्त किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो त्यानी आवर्जून हा उपाय करावा.

 टिप्स:

  • जर वेळ नसेल तर साखर मिसळून एक रात्र न ठेवता, साखरेचा दोनतारी पाक करून त्यामधे उकडलेले आवळे घालावे. परंतु या पध्दतीत पाण्याचा वापर असल्याने मोरावळा जास्त कालावधीपर्यत टिकण्यात साशंकता निर्माण होते.
  • आवळे आतपर्यंत नीट टोचून घ्यावेत.पाक चांगला मुरतो.
  • आवळे उकडलेले पाणी टाकून न देता, त्यात मीठ, साखर घालून सरबत करून प्यावे. अथवा आमटी, भाजी, पराठे करताना वापरावे.

आवळा खा. चेहरा सतेज राहतो,  म्हणजे चेहरा तरुण दिसतो.
आवळा खा. केस वाढीला लागतात, मग टक्कल पडणार नाही . 
आवळा खा.  नजर साफ़ राहील,  चश्मा लागणार नाही.
असा एव्हरग्रीन चेहेरा असला की प्रेमाची कमी नाही! 
मग विचार काय करताय ?

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *