THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती
The cuisine of Maharashtra is not just one but rather a collection of various local cuisines that differ region to region. Having conducted extensive research on these cuisines, we invite you to experience these regional flavours of Maharashtra. All the masalas are homemade and a well-kept secret. So relax, grab a seat and get comfortable.

शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती
- कांदा, खोबरं , खसखस, धणे व जिरे तेलात परतून वाटून घेणे. लसूण, तिखट व मीठाची चटणी वाटून घेणे. तेलाची नेहमीसारखी फोडणी करून त्यात वाटलेला कांद्याचा मसाला, लसणीचे तिखट व टोमॅटो प्यूरी घालून परतून घेणे. आता त्यात मिठाच्या पाण्यात ऊकडून घेतलेल्या शेंगा टाकणे. थोडा काळा मसाला टाकून ऊकळी येऊ दिली की भाजी तयार!!
- शेवग्याच्या शेंगा ऊकडून त्याचा गर काढून घ्यायचा. त्यात दही, मीठ, साखर,दाण्याचा कूट घालून वर तूप, जिरे व मिरचीची फोडणी घातली की रायता तयार!!
- तेलाची फोडणी करून थोडा कांदा परतून शेंगांचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी टाकणे. हळद ,तिखट, गोडा मसाला किंवा मालवणी मसाला व मीठ घालावे. परतून थोडे पाणी घालून भाजी शिजवून घेणे, वरून ओल्या खोबरयात काळी मिरी ठेचून घेणे व भाजीवर घालणे.
- चिंच गुळातील शेंगा पण छान लागतात. शेंगा उकडुन घ्यायच्या मग तेलावर मोहरी, जिरयाची फोडणी, थोडा मसाला किंवा तिखट, हिंग, हळद आणि वरुन चिंच गुळाचे पाणी,व मीठ घालून वाफ आणायची.
- शेंगा ऊकडून घ्याव्या. जिरे, किसलेले खोबरे, काळी मिरी,लाल मिरची,मीठ, साखर व बेसन हे बारीक वाटायचे. फोडणीत हा मसाला व पाणी घालून त्यात शेंगा घालून एक ऊकळी आणायची.
- शेंगवणी- चिंच,गूळ,2टिस्पून भाजलेलं बेसन, लसूण,कांदा व खोबरं भाजून पेस्ट करायची. फोडणी करून त्यात हा मसाला, तिखट, मीठ व शेंगा घालून रस्सा भाजी करायची.
- तेलाची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. मग त्यात बटाट्याच्या फोडी,शेंगा,खोबरं, तिखट, मीठ व गूळ घालून भाजी करायची.
- शेंगा ऊकडून त्यातील गर काढून घ्यायचा व त्यात आपल्याला आवडतील त्या ईतर भाज्या घालून कटलेट्स् बनवायचे.
- शेंगा ऊकडून गर काढून त्यात कांदा ,ज्वारीचे पीठ व बेसन घालून थालिपीठ करायचे.
- शेगोनी- फोडणीत आधी कांदा व त्यात शेंगा घालून परतून घ्यायचं. मग त्यात हिंग, हळद, तिखट व मीठ घालून शेंगा शिजवून घ्यायच्या. खोबरं, 2 लसूण पाकळ्या व दालचिनीचा तूकडा याचं वाटण करून त्यात टाकायचं. मग गूळ व आमसूलं(कोकम) व मीठ टाकायचं. वरून मोहरी व जिरं घालून खमंग फोडणी टाकायची व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचे.
- बेसन तेलावर खरपूस भाजून घ्यायचं. मग तेलावर कादा, टोमॅटो, हिरवी मिरची,आलं, लसूण व लाल तिखट परतून घ्यायचं. त्यात आधी भाजलेले बेसन घालून गरम पाणी घालायचे व शिजवलेल्या शेंगा आणि त्याचे पाणी. मग त्यात चिंच, गूळ, मीठ व भरपूर कोथिंबीर टाकून आमटी करायची.
- शेवग्याच्या शेंगा पाण्यात मीठ घालून ऊकडून घ्यायच्या. नंतर त्यातलं पाणी काढून शेंगांना तिखट, हळद आणि बेसन लावून घ्यायचं. कढईत तेलाची फोडणी करून त्यात वरील शेंगा टाकून परतून घ्यायच्या. मंद आचेवर शेंगा क्रिस्पी होईपर्यंत परतायचे व शेवटी दाण्याचा कूट घालून परतून सर्व्ह करायचे.
- प्रत्येकी 1टिस्पून ऊडीद दाळ, हरभरा दाळ, तूर दाळ,धणे,तीळ, 4-5 लाल मिरच्या व कडीपत्ता भाजून त्याची पूड करावी. तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात ही वाटलेली पूड टाकून तेल सूटेपर्यंत परतावे. मग त्यात मीठ व ऊकडलेल्या शेंगा टाकायच्या. आवडत असेल तर चिंच किंवा टोमॅटो व गूळ टाकावा.
- शेंगा पाण्यात ऊकडून घ्यायच्या. त्याचा गर व ऊकडलेले पाणी दोन्ही वापरायचे. त्यात मीठ, धणे-जिरे पूड टाकायचे. वरती जिरं व लसणाची फोडणी घालून सूप करायचे.
- सूप साठी आणखी एक कृती –शेंगेचा गर +दुध आणि शेंगा उकडलेले पाणी , थोडे कोर्न फ्लोअर, मीठ मिरपूड ,दालचिनी पूड/तुकडा –घालून ढवळून उकळी आणणे छान continental चवीचे सूप होते
Fantastic
Please post or email me.
We can use Shenga for preparing veg n non veg recipe. Like we can cook Shenga with prawns, Nivata fish, n any small fishes like Boit etc. Also we can cook Shenga with Val Birad, Sprouted Mung, Mataki etc