Smart Cooking Tips

१. टोमाटो ची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी तिला deep freezer मध्ये ठेवावे.

२. कोथिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो.

३. Fridge मध्ये एका पिशवीत खायचा सोडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही.

४. सफरचंद कापल्यावर  ते काळे पडू नये म्हणून त्याला लिंबू रस लावून ठेवा. सफरचंद दीर्घकाळ टवटवीत राहते.

५. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा अर्धा कापा आणि पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. कापताना डोळ्यातून पाणी येत नाही.

६. Sandwich  करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्या म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात. कापलेल्या कडा उन्हात वाळूवून मिक्सरमधून काढूल्या तर कटलेटसाठी चुरा वापरता येतो.

७. काकडी च्या कुठल्याही कोशिंबीरीला चोचवल्यावर किंवा चिरल्यावर थोडे लोणी लावा व मीठ लावून पिळून काढा म्हणजे कोशिंबीर पानात वाढेपर्यंत करकरीत राहील.

८. भज्या चे पीठ पाण्यात कालवण्यापूर्वीच त्यात  फेसून तेल घालावे. हळदी ऐवजी खाण्याचा पिवळा रंग घातल्यास भज्यांना रंग छान येतो. फेसून मोहन घातल्याने भाजी खुसखुशीत होतात.

९. मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावी. शिजल्यावर वांगी चिरून मसाला भरून तेलात परतणे म्हणजे चवदार लागतात.

१०. साधी शेव किंवा लसूण शेव करताना खुसखुशीत व्हावी म्हणून डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे.

११. कोणत्याही प्रकारची रसदार भाजी करताना त्यात थोडा मावा किसुन भाजून घातल्यास भाजी चविष्ट होते व भाजीचा रस्सा दाट होतो.

१२. खमण ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो. ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर  साधारण चमचाभर साखरपाणी टाकून ढोकळापात्र बंद करून ठेवावे. हे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो.

१३. डोश्या चे पीठ वाटताना त्यात भेंड्यांची बुडखे घालून वाटावे. डोसे खुसखुशीत होतात.

१४. आंब्याची डाळ करताना, डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन भिजत घालावी. त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो.

१५. इडली डोशाच्या नारळाच्या चटणी साठी खूप नारळ वापरण्याची गरज नाही.थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाईस प्रमाण आवश्यकतेनुसार घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होती.

१६. मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेले संबंध मुग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ठ होऊन तिची पौष्टिकता वाढते.

१७. कडवे(वाल) रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसरया दिवशी(फडक्यात न बांधता)एखाद्या कुंडीत पसरावेत त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात.

१८. आंब्याची डाळ करण्याची चांगली पद्धत म्हणजे डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मग भिजत घाला त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो.

१९. अळूवड्या करताना अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत थोड्या वेळाने ती चाळणीत काढून एका वर्तमान पत्रावर पालथी पसरावीत.प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे असे केल्याने वडी खाजत नाही.

२०. रताळी किसून वाळवावी व नंतर जेव्हा उपयोग करायचा तेव्हा मिक्सरमधून काढून त्यात दाण्याचा कुट, हिरवी मिरची,मीठ, जिरे वाटून घालून त्याचा गोळा करावा व नंतर उपवासाचे थालीपीठ करावेत.

२१. तिखट मिठाच्या पु-यां ची कणिक टोमाटोच्या रसात भिजवावी त्याला वेगळीच चव येते.

२२. मोड आलेल्या मटकी ला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो.

२३. ४ ते ५ बटाटे उकडून निवल्यावर बारीक कुस्करावेत. त्यात दोन-तीन कांदे चिरून तळून मिसळावेत. आले, लसून, मिरची यांची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी वरून कोथिंबीर घालावी. आवडी प्रमाणे मीठ घालावे.हा गोळा फ्रीज मध्ये ठेवावा याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो.

२४. नुसत्या उडदा च्या डाळीच्या उडीदवडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ  व मुगाची डाळ घालावी. ५-६  तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व लगेच वडे करावे. वडे अतिशय हलके आणि कुरकुरीत होतातच पण तेलही कमी लागते.

२५. डोसे करते वेळी डोश्याच्या पिठात एकदम डावभर तेल घालावे व पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालवेत कमी तेलात चांगले डोसे तयार होतात.

२६. बाटली डाळ खाताना ती कोरडी होते व घशाला घास बसतो. त्याकरिता एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजवताना एका वाटीत दोन चमचे साबुदाणा भिजवावा. डाळ वाटून फोडणीत टाकताना बरोबर भिजलेला साबुदाणा टाकावा व दुध ताकाचा शिपवा द्यावा म्हणजे डाळ मऊ होते.

२७. नाचण्या ची आंबील उन्हाळ्यात करावी म्हणजे उन्हाळा बाधत नाही.

२८. ढोकळा करताना आयत्यावेळी हळद घातली तर ढोकळा लाल होतो हे टाळण्यासाठी आदल्यादिवशी पीठ भिजवताना हळद घालावी व आयत्यावेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो लाल होत नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *