कांद्याचे विविध उपयोग

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच करता यात नाही. कांदा भजी, कांदे पोहे वगैरेची नुसती नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र कांदा हा फक्त खाण्याचा पदार्थ नाही. त्याचे अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे कांदा विविध प्रकारे वापरता येतो.

कांद्याचे विविध उपयोग

 • मार लागणार्‍या जखमेवर सुजेवर – कांद्याच्या २ फोडी कराव्या त्यावर हळद टाकावी व विस्तवावर ठेवून त्याला शिजवावे. खिळा, काटा, कांच रुतुन झालेल्या जखमेवर किंवा इतर ठेच लागुन लागलेल्या मारावर, दुखण्यावर कांदा बांधावा. ३ दिवसात आराम पडेल.
 • बेशुद्ध पडणे – कोणत्याही कारणाने बेशुध्द पडलेल्या माणसाला कांदा फोडून त्याचा वास दिल्यास मनुष्य शुध्दीवर येतो. दगडाने किंवा हाताने कांदा फोडून नाकाजवळ धरावा.
 • उन्हाळी होणे – उन्हाळी वगैरे उन्हाळ्यामधे नेहमी होतात. कांदा खाण्यामधे वापरल्याने त्यापासून बचाव होतो. १-२ कांदे जवळ ठेवून उन्हात फिरले तरी उन्हाचा फार त्रास होत नाही.
 • कृमी – पोटात कृमी झाले असे वाटल्यास कांद्याचा रस आणि वावडिंगाचे चूर्ण एकत्र मिळवून दिवसातून ३ वेळा घेतल्यास कृमी मरुन ते बाहेर निघतील.
 • प्रदर व प्रमेह — या विकारात कांद्याच्या रसाबरोबर मध सकाळ संध्याकाळ घेतल्याने फायदा होतो.
 • फ्ल्यू — कांद्याचा रस ३-३ तासाचे अंतराने १-१ चमचा दिल्यास फ्ल्यूमध्ये चांगला फायदा होतो.
 • मुलांच्या आकडीवर – कांदा फोडून त्याचा वास द्यावा.
 • लहान मुलास मोडशी व जंत झाल्यास  कांद्याचा रस द्यावा.
 • डोळे खाजवल्यास – कांद्याच्या रसात खडीसाखर उगाळून रात्री झोपताना डोळ्यास लावावी.
 • कावीळ – थोडा कांदा, थोडा गुळ, तेवढीच हळद टाकून रात्री झोपताना द्यावे.
 • डोळे आल्यास – डोळ्यात कांद्याचा रस एक थेंब टाकावा.
 • तंबाखूचा त्रास – तंबाखू खाण्यामूळे चक्कर आली व कासावीस वाटले तर त्यास कांद्याचा रस पाजावा.
 • मुळव्याधीवर – साखर ,तूप व थोडा कांद्याचा रस मिळवून द्यावा.
 • हागवणीवर – कांदा कापून बारीक करावा व पाण्यामधे स्वच्छ धुवून घ्यावा.  गाईच्या ताज्या दह्याबरोबर खावे म्हणजे हगवणीवर आराम पडतो.
 • फोडाचे दुखणे – कांद्याचा ठेचा करुन त्याला गरम तव्यावर तापवून तूपामध्ये परतून घ्यावे नंतर त्या लगद्याला फोडावर बांधावे. त्यामुळे दुखणे कमी होवून आराम वाटेल.
 • उचकी, डोके दुखणे व झोप न येणें या विकारावर कांद्याला चिरुन किंवा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. त्यामुळे आराम वाटेल.
 • सर्दी. पडसे – झोपेचे वेळी १ कांदा फोडून त्याचा वास द्यावा व एखादा कांदा खावून टाकावा. त्यामूळे सर्दीवर फायदा होतो. तसेच लहान मूलांना कांद्याचा रस चमचाभर पाजल्यास खोकल्यावरही फायदा होतो.
 • पासोळ्याचे दुखणे – कांद्याला बारीक वाटून तो बरगड्या (पासोळ्या) दूखतात त्या ठिकाणी बांधल्यास फायदा होतो.
 • उवा मारण्यास – कांद्याचा रस डोक्याला केसाला लावल्यास उवा, लीखा पळतात.

 

हे केवळ माहिती संकलन असून सर्वसाधारण गुणधर्म दिले आहेत. औषध म्हणून वापरताना तज्ज्ञांकडून सल्ला घेउनच वापरावे

HOW TO CELEBRATE BIRTHDAY AT HOME DURING “LOCKDOWN”?

Yes, it is a difficult time when all our plans get either postponed or cancelled. This is something we cannot predict and we don’t have control over, but you can surely try the following to celebrate your birthday and still be safe and home-

 • Try your hand in baking your own birthday cake. You can find cool and simple recipes with minimum ingredients which will not only make you learn baking but give you a sense of accomplishment.
 • Decorate your room with handmade and easy craftworks, candles and balloons, it’s birthday after all!
 • Connect virtually with extended family, cousins, and friends using the Zoom app while cutting a cake.
 • Last do not forget to order your daughter’s favourite dishes from Harsha Terrace Garden, TRP, Ratnagiri on 9011948080 / 8975380697.

TIPS FOR ORDERING HOME DELIVERY MEALS

Are you trying to save money on home delivery food? If so, here are some tips to order food from a restaurant. It takes a bit of time, but it will help you save money later.

 

 1. Make a menu.Decide which dishes you would like to order. Take help from the order taker from Harsha Terrace Garden chef’s special menu. When you have a plan, you will be less likely to over spend by ordering exact food.
 2. Follow Harsha Terrace Garden’s FB page for latest menus, offers if any. Just be sure to order the right quantity so that they don’t go to waste.
 3. Plan at least one dish which is everybody’s favourite at home.
 4. Check your kitchen refrigerator and freezer for any leftovers from the previous day and avoid over ordering.
 5. Consult Harsha Terrace Garden’s order taker for the quantity for sharing purpose.

Know what your family likes to eat. Encourage your family to share their favorites and help with ordering.

बडीशेप खाण्याने होणारे फायदे

हॉटेलमध्ये किंवा अगदी घरीही जेवण झाले की, आपण बडीशेप खातो. खालेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी बडीशेप उपयुक्त असते इतकाच त्याचा उपयोग आपल्याला माहीत असतो. मात्र बडीशेप आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर फायदेशीर असते. अन्नपदार्थाची चव वाढविण्यासाठीही बडीशेप खातात. यामध्ये आरोग्याला उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. यात तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनिज, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक याचा समावेश असतो. रोज बडीशेप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पाहूयात याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत…

 

 •  खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.
 •  बडीशेप खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसतील तर बडीशोप आणि गूळ खा. तसंच रोज बडीशेप खाल्ल्याने तुमच्या गर्भाशयाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही.
 •  ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडीशेप खूपच परिणामकारक आहे. हो. जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.
 •  बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
 •  ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडीशेप मिक्स करून दूधातून प्यावं.
 •  पोटात दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. पण लक्षात घ्या ही बडीशोप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.
 •  जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.
 •  बडीशेप खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही वाढते. यासाठी बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खावी.
 •  दररोज बडीशेप खाल्ल्यास तुमची दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात.
 •  बडीशेप हा अॅसिडीटीवरील रामबाण उपाय आहे. याचा वापर अनेक अॅसिडीटीवर आराम देणाऱ्या औषधांमध्ये केला जातो.
 •  जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.
 • 12 – घश्यात खवखव जाणवत असेल तर बडीशेप दिवसभर थोडी थोडी घेऊन चावून खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल. अनेक गायक, रेडिओ जॉकी आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जे प्रोफेशनल्स असतात. ते आपल्या आवाजासाठी रोज भाजलेली बडीशेप आणि खडीसाखर हमखास खातात.
 •  हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यात तुम्ही खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल आणि बरं वाटेल.
 •  बडीशेपचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी आणि तसंच सुडौल करण्यासाठीही केला जातो. बडीशोपमध्ये फ्लेवोनॉईड अॅस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. जे स्तनांचा आकार वाढवण्यात सहाय्यक असतं. दूधासोबत बडीशेप घेतल्यास स्तनांचा आकार वाढण्यास खूपच फायदा होतो.
 •  जर तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ 30 मिनिटं एक चमचा बडीशेप खावी. खरंतर बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते.
 •  जर तुम्हाला जुलाब लागल्यास बडीशेप खाण्याने लगेच आराम मिळतो. बडीशेपमध्ये एनिटोल आणि सिनेऑल नावाची तत्व असतात. जी कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यात सहाय्यक ठरतात. कारण यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात.
 •  तुम्हाला जर युरीनला जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खा. लगेच आराम मिळेल. ही गोष्ट अगदी खरी आहे कारण मी याचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे. उन्हाळ्यात बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यावर लगेच आराम मिळण्यासाठी बडीशेपच सेवन नक्की करा.
 •  जर तुम्हाला फार्टची समस्या असेल तर काही दिवस धनाडाळल आणि जिऱ्यासोबत बडीशेपेचं सेवन करा. नक्कीच फायदा होईल.
 •  जर तुमची पचनशक्ती चांगली करायची असेल तर सुकी, भाजलेली आणि कच्ची बडीशेप समप्रमाणात मिक्स करा आणि रोज का. तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि शरीराला जडत्वही जाणवणार नाही.
 •  बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.

लॉकडाऊन आणि उन्हाळा- हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर काम… या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेश्या विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नॅचरल एनर्जी ड्रिंक्स घेणे ‍कधीही परवडतं. आज आपण काही अशाच नॅचरल ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊ या….

लिंबू पाणी

लिंबू पाणी – जसं की सर्वाना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं

शहाळ्याचं पाणी

.

 

 

 

शहाळ्याचं पाणी – शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.

ताक

ताक – उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.

 

 

ग्रीन टी

 

ग्रीन टी – हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.

दूध पिणे – लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे हा सम्पूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे.

हे सगळं नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आहे जे घेतल्याने आपल्या शरीराला काहीच नुकसान होणार नाही हे फायदेशीरच आहे. हे घेतल्याने थकवा अजिबात जाणवणार नाही.

दही भात 

चला तर मग दही भात मागवूया “Harsha Terrace Garden”, Ratnagiri. Call: 9011948080 / 8975380697

पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, ” शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! ”

मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

 का खास आहे दही-भात

याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

वजन कमी होईल

स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.

कारण

कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.

Lemon Pepper Chicken

 

 

Chicken breasts out into baking dish. Drizzle with lemon juice and rub with olive oil. In a small bowl, whisk together lemon pepper, basil, oregano, and salt. Season chicken with mixture, coating all sides.

The History of Cafreal

If you are familiar with the word “Cafreal”, the first thing that pops in your mind is most likely to be tender chicken in a thick green-colored gravy accompanied by a spicy flavor. In the small state of Goa in India, it has become a signature dish among tourists and locals you can find Cafreal spice powder (masala) or paste which can be used not only for chicken, but also fish, mushrooms, cottage cheese, vegetables and much more.

So where does this delicious dish originate from? It is believed that Cafreal originated in Mozambique from a well-know dish called Galinha (Frango) Piri-piri. Later the Portuguese adopted this dish, but made a few changes to the ingredients before reaching the sandy shores of picturesque Goa hundreds of years ago.

In Goa, Cafreal recipes include garlic, lime juice, fresh coriander, mint, chillies and a dash of olive oil, while some prefer it the old-fashioned Portuguese way with lime, garlic and chilli. Cook this mix with chicken or vegetables and the outcome is mind blowing and leaves your taste buds asking for more.

You can use the spice mix in a gravy form, fried or barbecued, nevertheless, the outcome is always memorable. The next time you plan on cooking something special, try making your dish the Cafreal way!

 

 

CHICKEN CAFREAL: Chicken Cafreal is a spicy chicken dish which is must try for all those who love spicy food. The chicken pieces in this dish are marinated with a puree of coriander and a melange of spices. It also has the tang of tamarind paste which makes it mouthwatering. So, what are you waiting for? Go ahead and try this now and relish it with your loved ones.

 

The History of Vindaloo

In England, vindaloo is a tongue-searing curry, but it wasn’t always that way. The word vindaloo is a garbled pronunciation of the popular Portuguese dish carne de vinha d’alhos (meat marinated in wine-vinegar and garlic), which made its way to India in the 15th century along with Portuguese explorers. The dish was tweaked to local conditions: There was no wine-vinegar in India, so Franciscan priests fermented their own from palm wine. Local ingredients like tamarind, black pepper, cinnamon, and cardamom were also incorporated. But the most important addition—chile peppers—was a legacy of Portugal’s global empire, imported to India from the Americas. When the British occupied India from 1797 to 1813, they were delighted to discover this East-meets-West food, as well as Christian Goan cooks, who, free of caste and religious restrictions, were happy to make beef and pork dishes beloved by expats. In early British India cookbooks, vindaloo recipes remained close to the Goan original. But the dish gradually met the same fate as many Indian dishes when it was exported to England: It became another hot curry. The tang of vinegar disappeared along with the practice of marinating the meat, and the balance of different spices was lost under a blistering excess of chiles. Luckily, in Goa many versions still hark back to old days when cinnamon and cardamom provided an earthy elegance, and the heat was kept in check.

 

 

CHICKEN VINDALOO: Vindaloo or vindalho is an Indian curry dish popular in the region of Goa, Vasai, the surrounding Konkan, Kerala and many other parts of India. It is known globally in its British Indian form as a staple of curry house and Indian restaurant menus, and is often regarded as a fiery, spicy dish.

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही?

स्वयंपाक घरातून वेगवेगळे वास जसे सकाळ संध्याकाळ येत असतात तसेच काही आवाज देखील स्वयंपाक घराशी जोडलेले असतात. त्यातील एक आवाज आहे कुकरच्या शिट्टीचा! बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात!) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे! घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, “अरे जन लोक हो, मी हा प्रेशर कुकर शिट्टी होऊ नये म्हणून बनविला, तुमचे काम सोपे करण्यासाठी बनविला, शिट्टी नव्हे, शिट्या देऊन तुम्ही माझ्याशीच नव्हे तर विज्ञानाशी प्रतारणा करीत आहात! कुकरची एक ही शिट्टी होऊ देऊ नका! ज्या दिवशी मला या पृथ्वीतलावर एक ही शिट्टी ऐकू येणार नाही तो दिवस माझा मुक्तिदिन असेल!”

कुकरच्या जेंव्हा शिट्या होत असतात त्यावेळी त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असतो. वाफेवर पदार्थ लवकर आणि चांगले शिजतात हा प्रेशर कुकरचा मूळ उद्देश्य असतो. त्यासाठी कुकरचे बाहेरचे भांडे बनविले आहे. त्या भांड्यात पाणी घालून मग त्या पाण्यात एक धातूची जाळीदार ताटली तळाला ठेवली जाते. त्या ताटलीच्या वर थोडे पाणी घालून मग त्या जाळीवर कुकरच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ वेगवेगळे ठेवून ते एकावर एक ठेवून सर्वात वरच्या भांड्यावर झाकण ठेवले जाते. या भांड्यांमध्ये किती पाणी घालायचे याचा अंदाज गृहिणीला असतो आणि तेव्हढे पाणी ती त्यात घालते. त्यावर बटाटे, रताळी किंवा बीट ठेवता येतात. कुकर भरला की मग त्याचे झाकण शिट्टीसकट लावून तो गॅस च्या शेगडीवर ठेवतात. झाकण लावतांना त्याला रबर रिंग लावली जाते कारण ती रिंग लावली नाही तर निर्माण होणारी वाफ दाबाखाली असल्यामुळे हवेत निघून जाते आणि मग कुकर मध्ये पदार्थ शिजत नाहीत किंवा खूप वेळ लागून शिजतात. गॅस पेटवून मोठी ज्योत ठेवली जाते आणि तीन चार शिट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थंड व्हायची वाट पाहिली जाते. काही कुकर्स मध्ये वाफेचा दाब शून्य झाला की झाकण पडण्याची सोय असते. काही कुकर्स मध्ये शिट्टीतून वाफ येणे थांबले की कुकरचे झाकण उघडता येते. ही आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाण्याची सर्वसाधारण रीत आहे. आता यात कोणत्या चुका आपण केल्या ते लक्षात घेऊ.

१. कुकर मध्ये बऱ्याच वेळा धातूची जाळीदार चकती किंवा ताटली ठेवली जात नाही कारण ती भांड्यांच्या पसाऱ्यात किंवा इतर आहेरांच्या वस्तूंप्रमाणे कधी आणि कुठे लुप्त झाली ते लक्षात देखील येत नाही! कुकरच्या बाहेरच्या भांड्यात घातल्या जाणाऱ्या पाण्यावर त्यामुळे नियंत्रण राहात नाही.

२. कुकरमध्ये भांडी भरल्यानंतर झाकण लावतांना त्याची रिंग ओली केली जात नाही. त्यामुळे कुकर हवाबंद होत नाही आणि कुकरमध्ये वाफेचा दाब निर्माण होण्यासाठी वेळ लागून इंधनाची थोडीफार नासाडी त्यात होते.

३. शिट्टीसकट कुकरचे झाकण ठेवल्यामुळे सुरुवातीचा जो दाब निर्माण होतो तो आतील हवेचा आणि पाण्याचा एकत्रित दाब असतो. वास्तविक तो फक्त वाफेचा दाब म्हणून अपेक्षित असतो. जर त्यात हवा मिश्रित राहिली तर दाब निर्माण होतो पण त्याचे तापमान मात्र अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. शिट्टी होइपर्यंत जेव्हढा वाफेचा दाब निर्माण होतो त्याचे तापमान १२१ अंश सेल्सियस इतके असते. पण जर त्यात हवा असेल तर ते तापमान १०५ अंश सेल्सियस इतकेच वाढते. आणि पहिली शिट्टी होऊन ती हवा बाहेर फेकले जाईपर्यंत उष्णता त्या हवेला तापवित राहून वाया जाते.

४. प्रत्येक होणाऱ्या शिट्टीबरोबर आतील पाण्याची वाफ काही प्रमाणात बाहेर फेकली जाते आणि शिट्टी झाली की ती पुन्हा काही इंधन खर्च होऊन नव्याने वाफेचा दाब निर्माण करावा लागतो. त्यात वेळ देखील जातो आणि इंधन अपेक्षेपेक्षा अधिक जाळावे लागते. प्रत्येक शिट्टीबरोबर साधारण ३० मिलिलिटर पाण्याची वाफ बाहेर फेकली जाते. या वाफेत जवळजवळ सोळा किलो कॅलरी उष्णता बाहेर फेकली जाते. म्हणजे ही उष्णता जर तिथल्यातिथे बर्फ वितळविण्यासाठी वापरली तर १०० ग्राम तरी बर्फ त्यात वितळेल! अर्थात सर्व क्षमतांचा विचार केला तर तुमच्या घरात होणाऱ्या तीन शिट्ट्यांमुळे हिमालयातील ३०-४० ग्रॅम बर्फ वितळून जागतिक तापमान वाढीला रोज सकाळी संध्याकाळ हातभार लागत आहे आणि त्यामुळं होणारे हवामान बदल आपल्याला भोगावे लागत आहेत. बाहेर जाणाऱ्या वाफेमुळे आजूबाजूच्या वातावरणात ही फुकाची उष्णता मिसळून ते तापमान वाढते! स्वयंपाक घर गरम का होते त्याची जी अनेक कारणे असतात त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. भारतातील प्रत्येक घरात कुकरच्या शिट्या होऊन किती जागतिक तापमान वाढ आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

५. बाहेर जाणाऱ्या वाफेबरोबर अन्नातील जी पोषक तत्वे आहेत ती काही प्रमाणात तरी बाहेर फेकली जातात व अन्नाचे पोषणमूल्य घटते.

हे सर्व सहज टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी कटाक्षाने कुकर लावण्याची रीत समजावून घेणे आवश्यक आहे. ती रीत अशी:

१. कुकरमध्ये खाली जाळीदार ताटली ठेवूनच ती पूर्ण बुडेल इतकेच पाणी त्यात घाला.

२. कुकरमधील भांडी ठेवून झाली की मग झाकण लावीत असतांना रबर रिंग ओली करायला विसरू नका.

३. बटाटे, रताळी, बीट अशी कंदमुळे एक भांड्यात ओली करून ठेवा, त्या भांड्यात पाणी घालू नका, अन्यथा सर्व चांगली पोषणमूल्ये त्या पाण्यात उतरतील आणि तुमच्या आहारातून वजा होतील.

४. झाकणावर शिट्टी न ठेवता झाकण लावा आणि गॅसच्या शेगडीवर ठेवून ती ज्योत मोठी पेटवा.

५. काही वेळाने कुकर जसा गरम होईल तशी हवा बाहेर जात असल्याचे आवाजावरून समजते. जेव्हा वाफ यायची सुरुवात होते तेंव्हा शिट्टी ठेवा.

६. आतला वाफेचा दाब आता वाढू लागेल. तो एक विशिष्ट पातळीवर आला की शिट्टी फुरफुर करू लागेल.तो क्षण अचूक पकडून गॅसच्या शेगडीचे बटन सिम वर आणा म्हणजे शिट्टी होणार नाही.

७. घड्याळ लावून भातच शिजत असेल तर दीड ते दोन मिनिटांनी, डाळ, राजमा वगैरे पदार्थ असतील तर  पाच मिनिटांनी गॅस बंद करा.

८. कुकरची वाफ नैसर्गिक रीत्या हवेत जाऊ द्यात. कारण थंड होत असतांना शिजलेल्या अन्नातील रेणूंची पुनर्रचना होत शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते, म्हणून नळाखाली धरून कुकर थंड करू नका!

ही योग्य रीत तुम्ही वापरलीत तर तुमचे जे फायदे होतील ते असे असतील.

१. तुमचे इंधन वाचेल

२. चांगली पोषणमूल्ये तशीच राहून रुचकर भोजन मिळेल

३. जागतिक तापमान वाढीस तुमचा हातभार लागणार नाही आणि निदान त्या पापातून तरी मुक्ती मिळेल!

४. विज्ञान योग्य रीतीने वापरल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

५. आपला वैज्ञानिक मित्र पपेन ला मुक्ती मिळेल!

मग करणार ना आपल्या पर्यावरणाला आणि स्वतःला मदत? वसुंधरेशी ही सेवा प्रत्येकाने करावी याSइ एक वैज्ञानिक म्हणून मला मनापासून वाटते.