कोरोनाची भीती वाटतेय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, जाणून घ्या घरातील हळदीचे गुणधर्म

हळद आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्त्व असतं. ज्यामुळे हळद अँटी-इंफ्लेमेटरी अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध होते. जाणून घ्या हळदीचे गुणधर्म आणि उपाय…

थोडं पण कामाचं

  • स्वयंपाक घरातील हळद आहे अतिशय फायदेशीर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं करते काम.
  • हळदीमध्ये असलेलं करक्यूमिन तत्त्व हळदीला बनवतं अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध
  • दररोज जेवणात हळदीचा करा वापर, रात्री झोपवण्यापूर्वी गरम दुधात एक चिमूट हळद घालून पिणं फायदेशीर

‘आरोग्य धन संपदा’ असं म्हटलं जातं. कारण जर आपल्या आरोग्य उत्तम असेल तर आपण काहीही करू शकतो, इतर कुठल्याही संकटाशी सामना करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी आरोग्य चांगलं पाहिजे. सध्या देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं हे किती महत्त्वाचं आहे, हे निष्पन्न झालंय. आपल्या शरीरात येणाऱ्या कुठल्याही बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून बचाव करण्याचं काम आपली रोगप्रतिकारक शक्ती करत असते. ज्यांची इम्यूनिटी पावर कमी त्यांच्यावर आजारांचा परिणाम लगेच होतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्यूनिटी पावर वाढविण्याचे सर्व जण प्रयत्न करत असतात.

आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे प्रत्येकाच्या घरात असलेली हळद होय. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्त्व आढळतं. त्यामुळे हळद ही अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध असते. हळदीच्या याच गुणांना लाभ मिळवून घेण्यासाठी स्वयंपाक करताना आपल्या जेवणात हळदीचा वापर अवश्य करावा. तसंच रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये एक चिमूट हळद घालून ते हळदीचं दूध प्यावं.

‘एसएनईसी ३०’ ची निर्मिती करणारे आरब्रो फार्मास्युटिकल्सचे डॉ. सुभाष अरोरा यांनी सांगितलं, करक्यूमिनमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुण असतात. त्यामुळे शरीराचं रक्षण होतं. श्वसनाशी निगडित समस्या या अतिसंवेदनशील रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना उद्भवतात. करक्यूमिन आपली हिच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं काम करतं.

हळदीमध्ये ३-५ टक्के करक्यूमिन असतं. हे झाडांमधून उत्पन्न होणारं एक रसायन आहे. ज्यात उपचारासंबंधी अनेक गुण उपस्थित असतात. हळद सर्दी-खोकला, श्वास घेण्यात त्रास, अस्थमा इत्यादी संक्रमित आजार, व्हायरल ताप सारख्या समस्यांशी दोन हात करते. हळदीमुळे जळजळही कमी होते. त्यामुळेच शरीर हेल्दी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात हळदीचं सेवन दररोज करणं आवश्यक आहे.

हळदीचा औषध म्हणून कोणत्या विविध ठिकाणी वापर होतो?

स्वयपाकघरांचा आणि गृहिणींची जीव की प्राण असणारी हळद शरीरासाठी उपयुक्त आहे. भारतामध्ये हळदीची लागवड पूर्वीपासून केली जाते. हळदीचे रोप सुगंधी असते. हळदीच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या आणि चमकदार रंगाच्या असतात. या गाठी म्हणजे ‘हळद’.

ळदीचे प्रकार

  1. लोखंडी हळद – लोखंडी हळदीचा वापर फक्त रंग बनवण्यासाठी होतो.
  2. सुगंधी हळद – सुगंधी हळदीचा वापर मसाल्यात केला जातो.
  3. आंबे हळद – आंबे हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात.

हळदीच्या गाठी जमिनीतून काढून स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या सुकवल्या जातात. सुकवलेली हळद नंतर विकली जाते.

हळदीमुळे खाण्यात स्वाद तर वाढतोच पण या हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठीही होतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हळद फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. दुधातून हळद घेण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित आहेत. पण हळद गरम पाण्यातून सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

१) हळदीत करक्युमिननावाचे रसायन असते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी करक्युमिनहे रसायन फायदेशीर आहे.

२) हळदीत करक्युमिनअसल्याने गुडघेदुखी कमी होते.

३) बुद्धी तल्लख राहते.

४) डोकेदुखीच्या आजारात हळदीचे पाणी फायदेशीर

५) हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल नियंत्रणात राहते.

६) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

७) हळदीतील अँटीऑक्साइडकॅन्सरच्या कोशिकांना नष्ट करते.

८) हळदीच्या पाण्याने रक्त साफ होते.

९) रोज नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

൦) वजन कमी होण्यास हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.

११) हळदीच्या पाण्यामुळे जळजळ होणे थांबते, पचनक्रिया सुधारते.

 हळद हा जरी मसाल्याचा प्रकार असला तरी त्यात आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. हळदीमध्ये असलेल्या अनेक गुणांमुळे हळदीला केवळ जेवणातच नाही तर देवपूजेतही मानाचे स्थान आहे. जगातील एकूण हळदीच्या उत्पादनापैकी ८० टक्के हळदीचे उत्पादन हे आपल्या देशात होते आणि त्यातील १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. मुंबई बाजारपेठेमध्ये वर्षाला सरासरी तीन हजार ट्रक हळदीची आवक होते. त्यातून मुंबईकरांची हळदीची मागणी पूर्ण करून मग हळद जगभरात पाठविली जाते. त्यामुळे मसाल्याच्या हंगामात बाजारात हळदीचा सुगंधही दरवळतो.

हळद प्रत्येकाच्या घरात असतेच, कारण जेवणात तिचा उपयोग करण्याबरोबरच प्राथमिक औषध म्हणून तिचा वापर केला जातो. महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करताना आधी हळदीचा मान असतो मग कुंकवाचा. जेवणात हळदीचा वापार करण्याबरोबरच साधं लागलं तरी हळद लावली जाते. दुधात हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे म्हटले जाते. म्हणून हळदीचे दूध हे प्रत्येक घरात दिले जाते.

आपल्या देशात हळदीच्या उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात सातारा, सांगलीमध्ये हळदीचे पीक घेतले जाते. त्यानंतर आता कोकणातील शेतकऱ्यांनीही कोकणात हळदीचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. हळद म्हटली की राजापुरी हळद या नावाने बाजारात खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही हळद राजापूरची आहे, असा समज आजही अनेक लोकांचा आहे, मात्र राजापूरचा आणि या हळदीचा काहीच संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे राजापूरमध्ये हळदीचे उत्पादनच घेतले जात नाही.

आंध्र प्रदेश हा हळदीच्या उत्पादनात नंबर एकवर असल्याने मुंबई बाजारात तिथूनच मोठ्या प्रमाणात हळद येते. त्या पाठोपाठ तामिळनाडू आणि सांगली, साताऱ्यावरून हळद येते. मुंबई बाजारात दक्षिण भारतातून हळद येत असली तरी तिचा प्रवास हा व्हाया सांगली असा होतो. कारण कच्च्या हळदीवर प्रक्रिया करणारे कारखाने हे सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील ही हळद सांगलीला येते. तिथे तिच्यावर प्रक्रिया केली जाते. तिचे पॉलिशिंग होते. पॅकिंग होते आणि मग ती मुंबईच्या बाजारात दाखल होते. शेतातून निघणारी कच्ची हळद ही फार वेगळी असते. ती सुकवून तिच्यावर प्रक्रिया करावी लागते.

दक्षिण भारतातील हळद ही सेलम म्हणून ओळखली जाते तर महाराष्ट्रातील हळद ही राजापुरी हळद म्हणून ओळखली जाते. सेलम गडद पिवळ्या रंगाची असते तर महाराष्ट्रातील हळद काहीशी फिकी असते, मात्र चवीला राजापुरी अधिक गडद असते. त्यामुळे तिला जास्त मागणी आहे. सांगलीमध्ये हळदीचे मोठे गोदाम आहे, जिथे हळदीचा साठा करून ठेवला जातो, शिवाय तिच्यावर प्रक्रियाही केली जाते. तसेच, पारंपरिक पद्धतीने हळदीची येथे साठवणूक केली जाते. येथे जमिनीच्या आत खणून हळद पुरून ठेवली जाते. इथल्या काळ्या मातीत ती व्यवस्थित राहते. मागणीनुसार मग हळद बाहेर काढली जाते आणि बाजारात पाठविली जाते.

हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो.
१) हळदीमध्ये करक्युमिन नावाच रसायन असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.
२) तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुध्दी तल्लख राहते.
३) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.
४) अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते.
५) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.
६) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.
७) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.
८) बायोकेमिस्‍ट्री आणि बायोफिजिकल रिसर्च नुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.
९) शरीराच्या शुध्दीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.

लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला हळद

भारतीय संस्कृतीत लग्न आणि लग्न सोहळ्यातील विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर अनेक विधी केले भारतीय लग्नात केले जातात. यातील अनेक विधी वधू आणि वरांला भावी आयुष्यात सौख्य लाभावे यासाठी केले जातात. आजकाल प्रि – वेडिंग सेलिब्रेशन फारच लोकप्रिय होत आहे. त्यामुळे साखरपुडा, मेंदी, हळद, संगीत असे अनेक कार्यक्रम धुमधडाक्यात करण्याची पद्धत रुजू

होत आहे. या सर्व विधींमध्ये वधूवरांना हळद लावण्याचा विधी अगदी मस्ट आहे. रजिस्टर मॅरेज करणारे बरेच वधू आणि वर देखील

लग्नाच्या आदल्या दिवशी घरगुती हळद समारंभ करतात. कारण त्या निमित्ताने घरातील जवळची मंडळी आवर्जून लग्नकार्यात सहभागी

होतात. नवरा नवरीला हळद लावण्यामागे अनेक शास्त्रीय कारणेदेखील असतात. अनेकांच्या मनात लग्नात वधू आणि वराला हळद का लावली जाते या विषयी उत्सुकता असते. यासाठीच जाणून घेऊया हळदीचे लग्नसमारंभातील महत्व.

हळदीने सौंदर्य वाढते

हळदीमध्ये असे अनेक अॅंटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते. लग्नाचा दिवस हा प्रत्येक वधू आणि वरासाठी महत्त्वाचा दिवस असतो. सर्वांचे लक्ष लग्नात नवरा-नवरीकडे असते. अशावेळी त्यांनी इतरांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसणं अपेक्षित असतं. पूर्वीच्या काळी मात्र आतासारख्या ब्युटी ट्रिटमेंट अथवा पार्लरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे वधू आणि वराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लग्नात नवरा नवरीला हळद लावण्याची पद्धत रूजू झाली.

पिवळा रंग शुभ असतो

पिवळा रंग हे ऐश्वर्य आणि समृद्धीचा प्रतिक असतो. म्हणूनच काही लग्न पद्धतीत नववधू पिवळ्या रंगाचे महावस्त्र परिधान करते. पिवळा रंगाला धार्मिक महत्व आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी केल्या जाणाऱ्या विधींना देखील वधूवर पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. पिवळ्या रंग शुभ मानला जात असल्यामुळेच लग्नात हळदी समारंभ सुरू करण्यात आला असावा.

हळदीचे धार्मिक महत्व

लग्नात वधूवरांची सौभाग्य गाठ बांधली जाते. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. शिवाय हळदीला सर्वच धार्मिक विधीत एक महत्त्वाचं स्थान आहे. हळदीकुंकू वाटताना आधी हळद आणि मग कुंकू लावलं जातं. हळद पवित्र मानली जात असल्यामुळे लग्नात वधूवरांना हळद लावली जात असावी.

हळद आहे आरोग्यदायी

हळद हा एक मसाल्याचा पदार्थ असून आरोग्यासाठी ती फार उपयुक्त आहे. हळदीचा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. त्वचेच्या अनेक समस्या हळदीच्या लेपाने दूर होतात. एखादी गंभीर जखम असो वा साधं सर्दी-पडसं कोणताही आजार हळदीमुळे कमी करता येतो. आयुर्वेदातदेखील हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच नववधू आणि वराला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी लग्नात हळद लावण्याची पद्धत सुरू झाली असावी.

हळदी समारंभाने घरातील ताणतणाव कमी होतो

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद फारच उपयुक्त आहे. हळद एक उत्तम स्क्रबर असल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. डेड स्किन निघून गेल्यामुळे आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची त्वचा एकदम फ्रेश दिसू लागेल. त्वचेला पुरेसा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. लग्नाच्या धावपळीमुळे वधूवर आणि घरातील मंडळी थकलेली असतात. मात्र हळद लावणे आणि हळद खेळणे या विधींमुळे घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. शिवाय यामुळे तुमचा ताणतणावदेखील कमी होतो.